सोलापुर प्रतिनिधी : आज दिनांक २२/०३/२०२३ बुधवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास सोलापूर पाटबंधारे विभाग, सोलापूर येथील कार्यरत कर्मचारी संतोष उद्धव कांबळे ( वय ३९ ) रा. तळे हिप्परगा, तालुका. उत्तर सोलापूर, जिल्हा.सोलापूर येथील युवकाचे दुचाकीवर जिमसाठी जात असताना तुळजापूर-सोलापूर हायवे रोडवर अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेत जागीच मृत्यू झाला.

संतोष कांबळे हे एक अष्टपैलू क्रिकेटपटू, कष्टाळू, प्रामाणिक व शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण जलसंपदा विभाग, सोलापूर व तळे हिप्परगा ग्रामस्थांवर शोककळा पसरली.

वडिलांच्या निधनानंतर ते अनुकंपा तत्त्वावर शासकीय सेवेत प्रविष्ट होऊन साडेदहा वर्ष त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे, चिकाटीने व कष्टाने शासकीय सेवा, कौटुंबिक जबाबदारी, सामाजिक जबाबदारी नेटाने पार पाडली.
दुपारी तीन वाजता शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर अंत्यसंस्कार प्रसंगी तळे हिप्परगा येथील ग्रामस्थ, जलसंपदा विभागातील अधिकारी,कर्मचारी, समाजातील नेतेमंडळी, शासकीय निमशासकीय आरोग्य विभागातील शिक्षक व इतर संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

संतोष कांबळे यांच्या पश्चात दोन भाऊ, बहीण, आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय