शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 97 व्या जयंती दिनी वंचित बहुजन आघाडी व शिवसेना यांच्यामध्ये झालेल्या युती संदर्भात आज संवाद बैठकीचे आयोजन शिवसेना कार्यालय,इंदापूर येथे करण्यात आले होते.

मार्गदर्शक म्हणून शिवसेनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष मा.महेश पासलकर उपजिल्हा प्रमुख संजय काळे,वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा सचिव हनुमंत तात्या कांबळे, शिवसेना जिल्हा समन्वयक विशाल दादा बोंद्रे,उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीचे प्रमोद भाऊ चव्हाण, दीपक खरात गुरुजी यांनी उपस्थित शिवसैनिक,भीमसैनिक यांना मार्गदर्शन केले. यावेळी बाळकडू दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी माजी शिवसेना तालुका अध्यक्ष भीमराव भोसले, योगेश कणसे, वंचित बहुजन महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ मनिषा ताई चंदनशिवे, वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुका अध्यक्ष सागर गायकवाड,शिवसेना तालुका अध्यक्ष नितीन शिंदे, शहर प्रमुख मेजर महादेव सोमवंशी, सिद्धार्थ साळवे,पवन पवार, किरण गायकवाड , यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय