इंदापूर: प्रतिनिधी गोविंद पाडूळे : पोलीसांची कुरकुंभ येथे  मांगुर वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई, एक साधर्म्य असणाऱ्या टेम्पो क्रमांकाचं नेमकं गुपित काय?

पुणे सोलापूर हायवेला कुरकुंभ गावाच्या हद्दीत दौंड पोलीसांनी बेकायदेशीर मांगूर वाहतूक करणार्या टेंम्पो क्र. MH 42  AR 9559 यावर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांना चॉकलेटी रंगाचा आयशर टेम्पो क्रमांक MH 42 AR 9559, निळ्या रंगाच्या ताडपत्री मध्ये राष्ट्रीय हरित लवादाची बंदी असणाऱ्या मांगुर मासा याची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याचे माहिती मिळाल्यानंतर, कुरकुंभ गावच्या हद्दीमध्ये दौंड पोलिसांनी सदर टेम्पो ताब्यात घेऊन टेम्पो मधील  प्रतिबंधित मांगुर मासा कुरकुंभ कचरा डेपो येथे  नष्ट करण्यात आला. सदर टेम्पो इंदापूर येथील बिजवडी परिसरातील आहे.

यापूर्वी  पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे  मांगुर माशांचे तस्करी करणाऱ्या लाल रंगाचा टेम्पो (गाडी नं. MH 42 BF 5995)पोलिसांनी ताब्यात घेऊन मांगुर साठा नष्ट करून  टेम्पो चालक व मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सलग दोन महिन्याच्या आत पोलिसांनी मांगुर वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर पुन्हा एकदा कारवाई केली आहे.

इंदापूर, करमाळा, भिगवन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर मांगुरचे उत्पादन व व्यवसाय केला जात आहे.  ताडपत्रीमध्ये झाकून मांगुर माशांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असते. मुंबई,गुजरात, मध्य प्रदेश, नेपाळ इत्यादी ठिकाणी मासा पाठवला जातो. रात्रीच्या वेळी होणाऱ्या  बेकायदेशीर मांगुर वाहतूकीवर गस्तीच्या पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.

          परंतु इंदापुर येथून  नियमितपणे मांगूर वाहतूक सुरू असते, त्याच्याकडे  पोलीस काणाडोळा का करत आहेत? सदरच्या बेकायदेशीर मांगुर वाहतूक करणाऱ्या एक साधर्म्य असणाऱ्या क्रमांकाच्या टेम्पोंचे  गाडी मालकाचे नाव शोधून काढायला पोलीस अपयशी ठरत आहेत का ? इंदापूर तालुक्यातील असा कोणता मोठा राजकीय मासा आहे,ज्याला या अवैध मांगुर व्यवसायामधून लाखो  रुपयांची उलाढाल होत आहे? इंदापूर तालुक्यातील कोणत्या माजी मंत्र्यांच्या वरद हस्ताने हा बेकायदेशीर धंदा सुरू आहे? बेकायदेशीर मांगुर वाहतुकीच्या गाडीवर कारवाई करताना,मोठ्या माशाच्या मुसक्या न  आवळण्यासाठी पोलिसांवर राजकीय  दबाव येत आहे का?

            प्रशासन याचा पुर्णपणे बंदोबस्त  कधी करणार असा प्रश्न  सामान्य नागरिकांना पडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय