लातूर,दि.9(जिमाका):- 235- लातूर शहर विधानसभा मतदार संघ व 234- लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील सर्व जनतेस सुचित करण्यात येते की, भारत निवडणुक आयोगाच्या छायाचित्रासह मतदार यादी तयार करण्याचे निर्देश आहेत.त्यानुसार मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांकडुन छायाचित्र प्राप्त करुन ते मतदार यादीत अंतर्भुत करणे आवश्यक आहे.त्याअनुषंगाने संबंधित मतदारांच्या घरोघरी मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांचेव्दारा दिनांक 10 जून ते 22 जून 2021 या कालावधीत भेट देऊन छायाचित्र प्राप्त करुन घेण्यात येणार आहे.

तथापि, मतदार यादीत छायाचित्र नसलेल्यांपैकी काही मतदार त्यांच्या मतदार यादीत नमुद असलेल्या निवासी पत्त्यावर राहत नसल्याचे निर्दशनास आले आहे.अशा मतदारांची नावे, लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1950 व मतदार नोंदणी अधिनियमाच्या,नियम 1960 मधील तरतुद व भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गर्शक सुचनांनुसार मतदार यादीतुन वगळण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

मतदार यादीत छायाचित्र नसलेल्यांपैकी जे मतदार त्यांच्या मतदार यादीत नमुद असलेल्या निवासी पत्त्यावर राहत नसल्याचे आढळून येत असल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1950 व मतदार नोंदणी अधिनियमाच्या,नियम 1960 मधील तरतुद व भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गर्शक सुचनांनुसार मतदार यादीतुन वगळण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

 तसेच मतदार यादीत फोटो नसलेले मतदारांची यादी ही जिल्हा निवडणूक अधिकारी   तसेच मतदार यादीत फोटो नसलेले मतदारांची यादी ही जिल्हा निवडणूक अधिकारी लातूर यांचे कार्यालय,उपविभागीय अधिकारी कार्यालय,लातूर तहसिल कार्यालय लातूर , लातूर महानगरपालिका,लातूर ,पंचायत समिती,लातूर  सर्व ग्रामपंचायत कार्यालय,सर्व मतदार केंद्रावर तसेच लातूरचे NIC या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत असुन सर्व नागरीकांना यादी पाहण्यास उपलब्ध्  करुन देण्‍यात येणार आहे.

सततच्या पोटदुखीपासून बचाव करण्यासाठी हे ११ उपाय करा ?

           ज्या मतदारांचे छायाचित्र मतदार यादीत नाहीत त्यांनी त्यांचे फोटो व सदरील यादीतील नाव वगळण्यास आक्षेप असणाऱ्या व्यक्तींनी त्याचा लेखी आक्षेप संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) दिनांक 10 जून ते 22 जून 2021 या कालावधीत सकाळी 10 ते 12 या वेळेत मतदान केंद्रावर किंवा निवडणुक विभाग तहसिल कार्यालय,लातूर येथे दाखल करावे. अन्यथा कोणताही आक्षेप अथवा फोटो प्राप्त न झालयास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1950 व मतदार नोंदणी अधिनियमाच्या,नियम 1960 अन्वये व भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार कार्यवाही अनुसरण्यात येईल याची तमाम मतदारांनी नोंद घ्यावी असे आवाहन तहसिलदार लातूर तथा सहा.मतदार नोंदणी अधिकारी लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.

संपर्क7841913458

Email- abcmarathinews1@gmail.com

WebSite- www.abcmarathinews.com

करोना म्हणजे एकदम बाबा रामदेव बाबा- राखी सावंत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय