बॉलिवूड मधील कलाकार कधी काय करतील हे विश्वास बसणार नाही असेच आजकाल होत आहे. काहीजन तर म्हातारे झाले तरी लग्न करतात आणि विशेष म्हणजे तरुण अभिनेत्री सोबत. इथे आम्हाला एक मुलगी मिळेना बर यांना तरुण हिरोईन मिळते असो आपल ‘नसीबच गांडो तर काय करेल पांडू’ अशी गत झाली आहे आपली. तर आपण आज अशा काही कलाकाराबद्दल जाणून घेणार आहोत कि ज्यांनी पहिले लग्न केले तेंव्हा त्यांच्या पहिल्या लग्नात दुसर्या पत्नीचे वय काय होते? bollywood second marriages
धर्मेंद्रची दुसरी पत्नी हेमा मालिनी –
बॉलिवूडची ड्रीम गर्ल म्हणून एकेकाळी ओळखली जाणारी सुपरस्टार हेमा मालिनी हि धर्मेंद्र्ची दुसरी पत्नी आहे. हेमा मालिनी सोबत लग्न करण्यासाठी धर्मेंद्र ने धर्मांतर केले होते आणि गुप्तपणे लग्न केले होते.
धर्मेंद्र चे हे दुसरे लग्न होते. धर्मेंद्रचे पहिले लग्न 1954 साली प्रकाश कौर सोबत झाले होते. हेमा मालिनीचा जन्म 16/10/1948 रोजी झाला होता. म्हणजे धर्मेंद्र च्या पहिल्या लग्नाच्या वेळी हेमा मालिनी फक्त 7 वर्षाची होती. धर्मेंद्र चा जन्म 08/10/1935 ला झाला आहे.
जावेद अख्तर ची दुसरी पत्नी शबाना आझमी –
शबाना आझमी प्रसिद्ध गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर ची दुसरी पत्नी आहे. जावेद अख्तरचे पहिले लग्न 1972 मध्ये हनी इराणीशी झाले होते. जावेद एकेकाळी मद्यपी झाला होता, त्यामुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर खूप परिणाम झाला व त्यांचा संसार मोडीस आला.
जावेद अख्तरची दुसरी पत्नी शबाना आझमी चा जन्म 18/09/1950 रोजी झाला होता. शबाना सुद्धा बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री राहिलेली आहे. जावेदच्या पहिल्या लग्नाच्या शबाना 22 वर्षांची होती.
किशोर कुमारची चौथी पत्नी लीना चंदावरकर–
किशोर कुमार हे सुप्रसिद्ध गायक होते. त्यांचे जीवन हे खूपच रंगबेरंगी स्वभावाप्रमाणे होते. किशोर कुमारची चौथी पत्नी लीना चंदावरकर हि सुद्धा अभिनेत्री होती. किशोर कुमार यांच्या जीवनची कहाणी अत्यंत धक्कादायक राहिले आहे.
प्रसिद्ध गायक आणि अभिनेता किशोर कुमार चे पहिले लग्न 1951 मध्ये रूमा गुहा ठाकुरताशी झाले होते. तर किशोर कुमार ची चौथी पत्नी लीना चंदावरकर यांचा जन्म 1950 मध्ये झाला होता. म्हणजे किशोर कुमारच्या पहिल्या लग्नात लिना फक्त 1 वर्षाची होती. आहे का नाही धक्कादायक!
सैफ अली खानची दुसरी पत्नी करीना कपूर- bollywood second marriages
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर देखील बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची दुसरी पत्नी आहे. सैफ आली खानचे पहिले लग्न 1991 मध्ये अमृता सिंगसोबत झाले आहे. त्यावेळी अमृता बॉलिवूडची सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री होती. नंतर त्यांच्यात वाद विवाद झाले व त्यांनी घटस्फोट घेतला. करीना कपूर चा जन्म 21/09/1980 रोजीचा आहे.
पती सैफ अली खानच्या पहिल्या लग्नाच्या वेळी करीना कपूर नुकतीच 11 वर्षांची झाली होती. असे म्हटले जाते की करीना कपूर सैफ अली खान च्या पहिल्या लग्नातही पाहुणे म्हणून होती. विशेष म्हणजे करीनाने आपल्या पतीला काका म्हणून सैफचे अभिनंदन केले.
तर मग भेटू आपण असाच हटके काहीतरी घेऊन
धन्यवाद !
शारीरीक संबध – रेखाचे हे विधांन ऐकून लोकांची झोप उडाली होती; वाचून तुम्हालापण धक्का बसेल!
ताज्या आणि मनोरंजक करमणुकीच्या बातम्यांसाठी : ABC मराठी न्यूजचे Facebook Page ला लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा !
हे पण वाचा- या अभिनेत्री स्वतःच्या पतीच्या पहिल्या लग्नात किती वयाच्या होत्या ? एक तर 1 वर्षाचीच होती.