जालौन– प्रेमाला वय नसते,बंधन नसते या सर्व गोष्टी आपण लहानपणीपासुन ऐकत आलो आहोत. प्रेम हे केवळ प्रियकर-प्रेयसी,नवरा-बायको आणि आई-वडील यांच्यावरच असते असे काही नाही. काहीजण त्यांच्याकडे असलेल्या पाळीव प्राण्यांवरही नितांत प्रेम करतात आणि का करु नये.प्राणी जरी असले तरी ते देखील सजीवच असतात.
असो… पण प्रेम ही गोष्ट जितकी चांगली आहे ना तितकीच ती घातकीसुद्धा आहे. एखाद्यावर अति प्रेम केल्यावर त्यांच्या सोबत थोडासा जरी दुरावा आला तरी तो असह्य होतो. असेच काहीसे उत्तरप्रदेशात घडले. तेथील एक मुलगी कोणा व्यक्तीच्या नाही तर म्हशीच्या प्रेमात वेडी झाली होती. त्या मुलीचे त्या म्हशीसोबत इतके घट्ट नाते होते की तिला तिच्या म्हशीसोबतच मिनीटाचाही विरह सहन झाला नाही, त्यामुळे तिने खुपचं टोकाचे पाऊल उचलले.
युपीतील जालौन येथील कुरोना गावांतील एका व्यक्तीकडे ३ म्हशी होत्या. त्या व्यक्तीची मुलगी रजनी त्या म्हशींची देखभाल करायची. ती त्यांना अंघोळ घालायची,रानात चरायला घेऊन जायची. तिचे तिच्या म्हशींवर जिवापेक्षा जास्त प्रेम होते.
असेच ९ डिंसेबरला ती तिच्या म्हशींना चरायला घेऊन गेली असताना अचानक तिच्या सगळ्या म्हशी गायब झाल्या. रजनीने त्यांना शोधायचा खुप प्रयत्न केला पण त्या तिला सापडल्या नाहीत. म्हशी हरवल्यामुळे रजनीला खुप मोठा धक्का बसला.
तिने त्या गोष्टीचा धसका घेतला आणि ती निराशेच्या आहारी गेली. या निराशेत रजनीने स्वताला ग’ळ’फास लावुन संपवले.जेव्हा घरातल्या व्यक्तींनी तिला फा’सा’ला लटकलेले पाहिले तेव्हा तिला तातडीने दवाखान्यात दाखल आले. आता तिची प्रकृती व्यवस्थित आहे.
नवरदेवाची भन्नाट एन्ट्री! चक्क कुत्र्यासोबत आला बाईकवर बसून, Video व्हायरल