करमाळा येथील शुभांगी केकान यु पी एस सी मध्ये 530 वा नंबर मिळवून उत्तीर्ण झाल्या आहेत. करमाळा तालुक्यातील वंजारवाडी गावच्या शुभांगी सुदर्शन केकान यांचा यूपीएससीमध्ये 530 वा नंबर आला आहे.
संपूर्ण करमाळा तालुक्यातील नागरिकांसाठी ही अभिमानाची बाब आहे. शुभांगी यांचे वडील सुदर्शन केकान हे निवृत्त शिक्षक आहेत.
शुभांगी यांचे शिक्षण बीडीएस झाले आहे. करमाळा तालुक्यातील शेलगाव वांगी हे त्यांचे सासर आहे. सध्या वैद्यकीय सेवेसाठी त्या अहमदनगर जिल्ह्यात स्थायिक आहेत.
शुभांगी यांच्या यूपीएससीतील यशानंतर इंदापूर येथील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख एडवोकेट आनंद केकाण यांनी सांगितले ‘सध्याच्या काळामध्ये सर्वच क्षेत्रांमध्ये मुली पुढे आहेत ,जस्तीत जास्त मुलींनी प्रशासकीय क्षेत्रामध्ये येणे आवश्यक आहे’ व त्यांनी शुभांगी केकान यांचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच करमाळा व इंदापूरच्या आसपासच्या भागातील मुलांसाठी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी लोकसेवक गणपतराव आवटे फाउंडेशन मार्फत मदत करणार असल्याचे सांगितले.
ग्रामीण भागातील मुलांना स्पर्धा परीक्षेची तयारी करताना येणाऱ्या अडचणी संदर्भात चर्चासत्र आयोजित करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना लवकरच निवेदन देणार आहे असे सांगितले.