rohit pawar vs parth pawar

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना राज्य सरकारकडून वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. त्यावर विरोधकांकडून टीकेची झोड उठत आहे. यावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार रोहित पवार यांनी टोला लगावला आहे. पार्थ पवारांना खूप कमी दर्जाची सिक्युरिटी दिलेली आहे. पंतप्रधानांना जी सिक्युरिटी वापरली जाते ती सिक्युरिटी द्यायला पाहिजे होती, असा खोचक टोला रोहित पवार यांनी लगावला आहे. पुण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी हा टोला लगावला आहे. तसंच बारामतीतील लढतीवरही रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे. rohit pawar vs parth pawar

बारामती मातदारसंघावर म्हणाले…rohit pawar vs parth pawar

बारामती सुप्रिया सुळेंची लीड आम्ही तीन लाख धरत होतो. बारामती निवडणुक आता लोकांनी निवडणूक हातात घेतली आहे. सुप्रिया सुळे आधी तीन लाख मताने येतील, असं वाटत होतं. मात्र आता चार लाख मताधिक्याने त्या निवडून येतील. खडकवासलामधून लीड लोकच देणार आहेत. मोठे नेते सोसायटीतमध्ये जाऊन प्रचार करत नाहीत. तर राज्यभर फिरत आहेत. काही नेत्यांना आता सोसायोटी लेव्हल जावं लागत आहे.भाजपचा दबाव आहे. काही लोक दबाव सहन करतात काही दबाव सहन करत नाहीत. लोक आमची वाट बघत बसतात. भाजपला वाटत ते अजित पवार यांच्याबाबत केलं आहे, असं रोहित पवार म्हणाले.

बायकोसोबत जॉईंट होम लोनचे खाते काढल्याने, `हे` फायदे मिळतात, खूप कमी लोकांना माहिती आहे

रोहित पवारांचा खोचक टोला… rohit pawar vs parth pawar

यावेळी रोहित पवार म्हणाले की, सागर बंगल्यावर तेवढच काम चालतं. नेत्यांच्या मुलांना सिक्युरिटी दिली पाहिजे, ते फडणवीस करत आहेत. नेत्यांना सांभाळणं आणि सर्व सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडणं एवढंच काम ते करत आहे. कोयता गँग सामान्य लोकांना त्रास देतंय. मर्डर सामान्य लोकांचे होत आहेत, महिलांवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे, सामान्य लोकांना सुरक्षा देण्याची काही गरज नाही.

सागर बंगला खूप चांगलं काम करत असल्याचं रोहित पवार म्हणाले. तसेच, माझं अस मत आहे की, पार्थला अजून दोन-तीन सिक्युरिटी द्यायला पाहिजे होती, रणगाडा जर कुठं चालत असेल तर रणगाडाही द्यावा, जेणे करून त्याच्या सुरक्षेत वाढ होईल. अशा शब्दात रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना त्यांच्याच शब्दात सुनावले आहे.

तसेच  रोहित पवार म्हणालेत…पार्थ पवारांच्या वाय प्लस सुरक्षेबाबत काही विश्लेषक याबद्दल वेगळ्या अर्थाने बोलत आहेत… मध्ये गाडी असते, दोन्ही बाजूला दोन गाड्या असतात. या इलेक्शन मध्ये जो पैसा वापरला जाणार आहे. या इलेक्शनचा पैसा या गाड्यामधून जाईल की काय असं शंका व्यक्त केली जाते. सिक्युरिटी गाड्या एका राजकीय व्यक्तीच्या मुलाला दिल्या जात असतील तर अनेक शंका निघू शकतात. लोक याबद्दल वेगवेगळी चर्चा करत आहे. पोलीस गाड्या आणि ॲम्ब्युलन्सचा वापर देखील पैसे देण्यासाठी वापरला गेला. असं बोललं जात होतं, असं रोहित पवार म्हणालेत.

आधी अजितदादा बैठक बोलवत असे. आता दादांना बोलवावं लागत आहे. हे दुर्दैव आहे. राज ठाकरेंची सभा बारामती लोकसभा मतदारसंघात झाली तर सुप्रियाताईंचं लीड 40 हजाराने वाढेल एवढं मात्र नक्की, असा विश्वासही रोहित पवारांनी व्यक्त केला आहे. rohit pawar vs parth pawar

फक्त सहा हजाराची लाच मागणारा तलाठी एसीबीच्या जाळ्यात! talathi georai news today

हे पण वाचा ….

आमच्या ग्रुप मध्ये जॉईन व्हा

क्लिक करा 

फक्त 2 मिनिटात तुमच्या फोनवरून आधार कार्डमधील मोबाईल नंबर बदला

मित्रांनो, ताज्या अपडेटसरकारी योजना, देशातील चालू परिस्थिती, ट्रेंडिंग, कृषी, सामाजिक, राजकीय आणि ऐतिहासिक माहितीसाठी

आमच्या http://www.abcmarathinews.com ह्या वेबसाईटला नेहमी भेट देत रहा. किंवा व्हाट्सअप ग्रुपला देखील जॉइन होऊ शकता.


एबीसी मराठी न्यूजच्या महत्त्वाच्या बातम्या थेट WhatsApp वर मिळवण्यासाठी या समुदायात सामील व्हा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय