निलंगा प्रतिंनिधी- विशाल मुंडे
दोन तरुणांचा शेतात फवारणी करत असताना शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना अत्यंत हृदयद्रावक आहे.
शेततळ्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवार दि 19/10/2021 रोजी दुपारी एक वाजता निलंगा तालुकयातील मुदगड (ए.) येथे घडली. बाळू उर्फ भैरवनाथ ज्योतीराम तोरंबे (वय 28, रा. मुदगड (ए.) ता. निलंगा, जि.लातूर) व रणजीत बळीराम इंगळे (वय 35, , रा. मुदगड (ए.) ता. निलंगा, जि.लातूर) अशी मृतांची नावे आहेत.
भैरवनाथ ज्योतीराम तोरंबे व रणजीत बळीराम इंगळे हे दोघे मजूर व गरीब घरातील असुन ते दोघे संगप्पा माशाळकर यांच्या शेतातील शेततळ्यातील पाणी फवारणी करिता पाणी आणण्यासाठी गेले होते. यावेळी भैरव तोरंबेचा पाणी घेत असताना पाय घसरून शेततळ्यातील पाण्यात पडला. त्याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडत होता. त्यावेळी त्याला वाचवण्यासाठी रणजित इंगळे ही पाण्यात गेला. परंतू यावेळी दुर्दैवाने त्या दोघांचाही पाण्यात बुडून जागीच मृत्यू झाला.
ही घटना अत्यंत दुःखद आहे. या घटनेची माहिती मिळताच मयताचे बंधु संजय बळीराम इंगळे यांनी कासारशिरसी पोलीस ठाण्यात दिली. दरम्यान, सहाय्यक पोलिस निरीक्षक रेवनाथ ढमाले, विकास भोंग, वरवटे, भोसले यांनी घटनास्थळी भेट येवून पंचनामा केला. अधिक तपास पोहेकॉ वरवटे हे करीत आहेत
हे पण वाचा – कांद्याचे भाव अचानक कमी झाल्याचे नेमकं कारण काय?
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! ईयत्ता १ली ते १२ वी पर्यंतची सर्व पुस्तके फ्री मध्ये उपलब्ध
चंदन शेती करोडोचे उत्पन्न देणारे पीक ! वाचा सविस्तर..
OMG! 2 लाख 70 हजार प्रती किलो आंबे ! जगातील सर्वात महाग आंबा ? सविस्तर माहिती जाणून घ्या!
“परंपरा विश्वासाची”
बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.
संपादक – आनंद पाटील
मुख्य संपादक – ताम्रध्वज मनाळे.
संपर्क–7841913458 / ९८३४८५८०५८
Email- abcmarathinews1@gmail.com
WebSite- www.abcmarathinews.com
🌐ABC Marathi न्यूज नेटवर्क📡
⭕👉 संपुर्ण महाराष्ट्रात जिल्हा / तालुका प्रतिंनिधी नेमने चालू आहे. इच्छुकांनी संपर्क करा !
या साईट ला सब्सस्क्राईब करा !
फेसबूक पेज ला आत्ताच Follow करण्यासाठी क्लिक करा