इंदापूर: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी श्री मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसापूर्वी उपोषण सुरू केले आहे. महाराष्ट्र मध्ये मराठा समाज आरक्षण मिळावे यासाठी शांततेच्या मार्गाने आक्रमक झालेला दिसून येत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व गावांना साखळी उपोषण सुरू करण्याचा आव्हान केला आहे. या आव्हानाला महाराष्ट्रातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे अमरण उपोषण सुरू केले आहे. सद्यस्थितीला मनोज जरांगे पाटील यांची तब्येत थोडी घालवलेली आहे तरीसुद्धा शासन मराठा आरक्षणाच्या प्रश्नाकडे गांभीर्याने बघत नाही यामुळे महाराष्ट्रातील अनेक गावांनी साखळी उपोषण सुरू केले आहे तसेच राजकीय नेत्यांना व पुढाऱ्यांना गावांमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.
कालठण नंबर एक मध्ये सुद्धा साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. याचबरोबर गावामध्ये प्रवेश करण्यास राजकीय नेत्यांना व पुढाऱ्यांना बंदी घातली आहे. साखळी आंदोलनासाठी गावातील सर्व जाती-धर्माचे लोक सकाळी उपोषणाला पाठिंबा देत आहेत. यामधून सामाजिक ऐक्य निर्माण होत आहे.