श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर आता आणखी एक थरकाप उडवणारं हत्याकांड (Murder Mysterey) समोर आलेल आहे. हे हत्याकांड आग्रामध्ये घडलं असून. एका BCA विद्यार्थीनीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर तिचं शव हे यमुना एक्स्प्रेस (Yamuna Express) येथील सर्विस रोडवर एका ट्रॉली बॅगमध्ये फेकून देण्यात आलं होतं.

  • पोलिस स्टेशन मध्ये तक्रार ड्रामा-

दरम्यान, याप्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल केली होती. धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा हे प्रकरण कळल्यानंतर पोलिसांनी मृत मुलीच्या घरी जाऊन चौकशी केली, तेव्हा या मृत मुलीचे वडिलही घरी नसल्याचं उघडकीस आलं. अखेर पोलिसांच्या तपासाअंती वडिलांनीच आपल्या मुलीची गोळ्या घालून हत्या केली असल्याचं निदर्शनास आलंय.

  • मृतदेह बॅगमध्ये आढळला –

18 नोव्हेंबर रोजी एक बॅग पोलिसांना आढळून आली. या बॅगच्या आजूबाजूला रक्ताचे डाग दिसले होते. या बॅगमध्ये एका मुलीचा मृतदेह असल्याचं निदर्शनास आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. हा मृतदेह आयुषी नावाच्या एका विद्यार्थीनीची असल्याचं समोर आलं. ही विद्यार्थीनी बीसीएचं शिक्षण घेत होती.

मृतदेह हाती लागल्यानंतर पोलिसांनी मृत मुलीच्या घरचा पत्ता 48 तासांच्या आत शोधून काढला. जेव्हा पोलीस मृत मुलीच्या घरी पोहोचले, तेव्हा तिथे मुलीचे वडील नितीश यादव घरी नव्हते. त्याच क्षणी पोलिसांना मुलीच्या वडिलांवर हत्येचा संशय आला होता. अखेर पोलिसांनी रविवारी मृत मुलीच्या वडिलांना शोधून काढलं आणि त्यांची चौकशी केली.

चौकशीअंती मृत मुलीच्या वडिलांनी हत्येची कबुली दिलीय. राहत्या घरातच आयुषीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली असल्याचं त्यांनी कबूल केलं. दरम्यान, पोलिसांनी अद्याप या हत्येचं कारण नेमकं काय होतं, हे स्पष्ट केलेलं नाही. आज या प्रकरणाचे सगळे खुलासे पोलीस पत्रकार परिषद घेऊन करण्याची शक्यताय.

17 नोव्हेंबर पासूनच 21 वर्षांची आयुषी यादव बेपत्ता होती. पण ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस देण्यासाठी तिच्या घरातून कुणीच आलं नव्हतं. शिवाय तिचे वडीलही घरातून नेमके कुठे गायब झाले होते, असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. आयुषी आणि तिचे कुटुंबीय दिल्लीतील मोड बंद या गावात राहत होते. आयुषीच्या हत्येचं गूढ उकलण्याचं आव्हान सध्या पोलिसांसमोर आहे.

आषुषीची हत्या 17 नोव्हेंबर रोजी करण्यात आली असावी, अशी शंका व्यक्त केली जातेय. त्यानंतर तिचा मृतदेह घरातच ठेवला गेला होता. रात्र झाल्यानंतर आयुषीचे वडील तिचा मृतदेह घेऊन ट्रॉली बॅगसह घरातून निघाले. ट्रॉली बॅगमधील तिचा मृतदेह ते वाटेत यमुना एक्स्प्रेवर फेकण्याच्या इराद्याने निघाल्याची पोलिसांना शंका आहे.

ज्या डेटिंग अॅपमुळे भेटले तेच ठरलं हत्येचंही कारण; श्रद्धासोबत लिव्ह इनमध्ये असतानाच 20 मुलींना डेट करत होता आफताब, मग..

पण वाटेत कुठेच संधी न मिळाल्यानंतर यमुना एक्स्प्रेस वे च्या किनाऱ्यावर मृतदेहाने भरलेली ट्रॉली बॅग नंतर आढळली. यानंतर एकच खळबळ उडाली होती. ही घटना 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गंभीर दखल घेत पुढील कारवाई केली.

आता हे हत्याकांड नेमकं कोणत्या कारणावरुन घडलं? कुणी घडवून आणलं? यासारख्या अनेक प्रश्नांची उकल पोलिसांच्या तपासाअंती होईल. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

खऱ्या प्रेमाचा दुर्दैवी शेवट! गर्भवती पत्नीच्या अपघाती मृत्यूनंतर पतीची आत्महत्या, जुन्नरमधील दुःखद घटना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय