लेखक- सतीश भोसले Solapur towel

सोलापूर येथील वस्त्रोद्योग व हरहुन्नरी कलावंत कायम माझ्या आवडीचे व आनंदी अभ्यासाचे विषय राहिले आहेत. शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर येथे स्थापत्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम पूर्ण करताना ४ वर्षाचे टेक्स्टाईल इंजिनिअरिंग चे आमच्या शाळेतील व इतर काही जण सोबत होते. यार्न मॅन्युफॅक्चरिंग व फॅब्रिक मॅन्युफॅक्चरिंग ह्या दोन विषयांवर त्यांची कायम चर्चा सुरू असायची, प्रथम सोलापूरी चादर  व नंतर नॅपकिन्स ची वैशिष्ट्यपूर्ण कलात्मक निर्मिती ने येथील निर्मात्यांनी जगाला भूरळ घातली.

Solapur towel

मला आठवतेय अमिताभच्या लावारिस सिनेमाच्या सोलापुरातील कल्पना टॉकीजच्या प्रदर्शन दिवशी अमिताभ च्या चित्राचे विणलेले नॅपकिन्स थिएटरमध्ये लावले होते. पिढी बदलली, आता माझ्या सोबतचे माझे वर्गमित्र कारखानदारी करत नव्याने प्रयोग करत आहेत. मागणीनुसार बदलत सोलापूरी ब्रँड बनवत आहेत. राहुल टेक्स्टाईल्स चे मालक अंबादास बासुतकर काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत ३.५-४ हजार डिलरना सोलापूरी प्रॉडक्ट पाठवत आहेत. आमच्या महाराष्ट्र राज्यातील इंजिनिअर बंधूभगिनींची कनिष्ठ अभियंता संघटना महाराष्ट्र राज्य ही शतकोत्तर परंपरा असलेल्या संघटनेच्या माध्यमातून सभासद सर्वांशी समन्वयाने विकास योजना राबवत आहेत.

याचाच भाग म्हणून सोलापूरी टॉवेल्स एम्ब्रॉयडरी करून घेतले आहेत. एम्ब्रॉयडरी कलाकार सिध्देश्वर एम्ब्रॉयडर्सचे मालक सिध्देश्वर कोंका यांनी संघटनेचे बोधचिन्ह व बोधवाक्य उत्तमरित्या टॉवेल्स वर विणून दिले. आज त्यांचा जास्तीचा वेळ घेऊन संघटनेचे लढाऊ सरचिटणीस सन्मित्र इंजि उन्मेष सरांच्या फोटोचे लाईनवर्क सहज बनवून घेतले.सोलापूरच्या पूर्व भागातील कलाकारांना मानाचा मुजरा, पुर्व भागातील कलेचा रंग या फाल्गुनपौर्णिमेला सर्वांच्या आयुष्यात भरभराट आणो हिच तुळजाभवानी चरणी प्रार्थना🙏सतीश भोसले, सोलापूर

ताज्या आणि मनोरंजक करमणुकीच्या बातम्यांसाठी : ABC मराठी न्यूजचे  Facebook Page  ला लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा !

हे पण वाचा- या अभिनेत्री स्वतःच्या पतीच्या पहिल्या लग्नात किती वयाच्या होत्या ? एक तर 1 वर्षाचीच होती.

“परंपरा विश्वासाची”

🌐ABC Marathi न्यूज नेटवर्क📡

⭕👉 संपुर्ण महाराष्ट्रात जिल्हा / तालुका प्रतिंनिधी नेमने चालू आहे. इच्छुकांनी संपर्क करा !

📲7841913458

बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.

संपादक – आनंद पाटील

मुख्य संपादक – ताम्रध्वज मनाळे.

संपर्क–7841913458 / ९८३४८५८०५८

Email- abcmarathinews1@gmail.com

WebSite- www.abcmarathinews.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय