इंदापूर : राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर इंदापूर येथे राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी रॅली काढूण पवार साहेब यांचा जयजयकार केला. राज्यातील अचानक घडलेल्या परिस्थितीमुळे इंदापूर येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी संभ्रमावस्थेत आहेत. काही कार्यकर्त्यांनी अजितदादा पवार यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे तसेच काही कार्यकर्त्यांनी पवार साहेबांशी एकनिष्ठ राहणार असल्याचे सांगितले आहे.
राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्ष छाया पडसळकर यांनी पवार साहेब यांच्या सोबत एकनिष्ठ राहणार असल्याचे सांगितले. सागर मिसाळ यांनी साहेबांसोबत राहणार, येणाऱ्या काळामध्ये साहेब सांगणार त्याच उमेदवाराचे काम करणार असे सांगितले.
इंदापूर तालुका युवक उपाध्यक्ष अक्षय कोकाटे यांनी पवार साहेबांसोबत एकनिष्ठ असल्याचे व अजितदादा यांनी परत पवार साहेबांसोबत येण्यासाठी आवाहन केले. यावेळी उपसरपंच नानासाहेब भोईटे, प्रसिद्ध कुस्ती निवेदक सुभाष दिवसे, दादासाहेब थोरात श्रीकांत मखरे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.