प्रसिद्ध श्रद्धा वालकर खून प्रकरणातील आरोपी आफताब अमीन पूनावाला त्याच्या लिव्ह-इन पार्टनरसोबत राहत असताना त्याच्या 20 हून अधिक गर्लफ्रेंड होत्या. ‘बंबल डेटिंग अॅप’च्या माध्यमातून त्याने या मुलींशी मैत्री केली होती, त्यापैकी बहुतेक त्याच्या घरीही आल्या होत्या. अनेकांशी त्याचे जवळचे संबंध बनले होते. हे सर्व आफताबनं श्रद्धासोबत रिलेशनशिपमध्ये असताना केलं.
टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, आफताब पूनावालाने दिल्ली पोलिसांच्या चौकशीदरम्यान हा खुलासा केला आहे. पोलिसांनी ‘बंबल’ या डेटिंग अॅपला पत्र लिहून आरोपीच्या सर्व गर्लफ्रेंड्सची माहिती मागवली आहे. या सर्व मुलींची लवकरच आफताबबाबत चौकशी केली जाऊ शकते, असं सांगण्यात आलं आहे. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे आफताब आणि श्रद्धाचाही भेटही ‘बंबल’ डेटिंग अॅपवरच झाली होती.
शारीरीक संबध – रेखाचे हे विधांन ऐकून लोकांची झोप उडाली होती; वाचून तुम्हालापण धक्का बसेल!
या सर्व गर्लफ्रेंड्ससोबत तो वेगवेगळ्या सिमकार्डद्वारे बोलायचा. प्रत्येक सिम तो स्वत:च्या नावावर घेत असे. त्याने दिल्लीतून अनेक सिम घेतले होते. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धाची हत्या केल्यानंतर आरोपी आफताबने त्याचा मोबाइल हँडसेट ओएलएक्सवर विकला होता आणि सर्व सिमकार्ड नष्ट केले होते. त्यानंतर आरोपीने दिल्लीहून त्याच्या परमनंट नंबरचं दुसरं सिम घेतलं होतं. त्याने दिल्लीतच नवीन मोबाईल हँडसेट खरेदी केला होता.
हे पण वाचा -या अभिनेत्री स्वतःच्या पतीच्या पहिल्या लग्नात किती वयाच्या होत्या ? एक तर 1 वर्षाचीच होती.
आफताब पूनावाला याला अलीकडेच दिल्ली पोलिसांनी श्रद्धा वालकरची हत्या करून तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून दिल्लीत विविध ठिकाणी फेकल्याप्रकरणी अटक केली होती. यापूर्वी श्रद्धा सापडत नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी महाराष्ट्रातील पालघरमधील वसई शहरातील माणिकपूर पोलीस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार नोंदवली होती. दिल्ली पोलिसांनी आफताबला दक्षिण दिल्लीतील छतरपूरच्या जंगलात श्रद्धाच्या शरीराचे अवयव कथितपणे फेकून दिलेल्या ठिकाणांचा शोध घेण्यासाठी नेले. दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांनी बुधवारी पुन्हा दक्षिण दिल्लीतील छतरपूर येथील आफताबच्या भाड्याच्या घराला भेट दिली.
असं म्हटलं जात आहे की 18 मे 2022 रोजी आफताबचं श्रद्धासोबत भांडण झालं. जेव्हा श्रद्धाने त्याच्यावर इतर मुलींशी संबंध असल्याचा आरोप केला. आफताबने श्रद्धाला मारहाण केली आणि ती बेशुद्ध झाल्यावर तिच्या छातीवर बसून तिचा गळा दाबला. दिल्ली पोलिसांनी आरोपीसोबत हे संपूर्ण दृश्य पुन्हा तयार केले. या प्रकरणी पोलिसांना रक्ताचे डाग, एक पिशवी, कपडे असे काही महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत.
पोलिसांना छतरपूर टेकडी परिसरातून काही सीसीटीव्ही फुटेजही मिळाले आहेत, ज्यामध्ये आफताबच्या हालचाली रेकॉर्ड झाल्या आहेत. मात्र, पोलीस अद्याप हत्या आणि मृतदेह छिन्नविछिन्न करण्यासाठी वापरलेले शस्त्र, शरीराचे अवयव आणि इतर काही सीसीटीव्ही फुटेज शोधत आहेत.
‘महाविकासआघाडी’मध्ये पुन्हा धुसफूस, राष्ट्रवादीमुळे काँग्रेसची बैठकीला दांडी!