महाविकास आघाडी सरकार

Table of Contents

प्रतिनिधी: अजिनाथ कनिचे/ माढा महाविकास आघाडी सरकार

महविकास आघाडी सरकारने राज्यातील चालू कर्जदार शेतकऱ्यांची प्रोत्साहनपर अनुदानाची 50 हजार रुपये रक्कम बँकांना दिली नाही.

परिणामी मोठ्या आशेने आतुरतेने याची वाट बघत बसलेले शेतकरी थकबाकीदार झाले आहेत.

त्यातच अजितदादा पवार यांनी जून2021 पासून 3 लाख रुपयांपर्यंत पीककर्ज शुन्य टक्के व्याजदराने कर्जवाटप करणार असल्याचे जाहीर केले.

तेव्हापासून शेतकरी तीन लाख रुपये कर्जाच्या बाबतीत विचारना करीत आहेत.

तसेच पिकाकर्जा साठी वणवण फिरत आहेत.

असा आरोप स्वाभिमानीचे जिल्हा कार्याध्यक्ष अजिनाथ परबत यांनी केला आहे.

शेतकऱ्यासाठी योजना म्हणजे गाजराचा मुळाचमहाविकास आघाडी सरकार

शेतकऱ्यांना सध्या गरज आहे ती वाढीव पीक कर्जाची रक्कम जास्तीतजास्त तीन लाख रुपये पर्यत मिळण्याची परंतु यांनी कर्जवाटप न केल्यामुळे नाईलाजास्तव शेतक-यांना सावकारांकडे जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे.

त्यामुळे तो आर्थिक संकटात सापडलेला आहे त्याला आधार देण्याची गरज असताना वाढीव पिककर्ज त्याला वाटप होत नाही.

ही मोठी शोकांतिका आहे.त्यामुळे या योजनेमुळे शेतकऱ्याला काडीचाही फायदा होणार नाही म्हणून योजना फसवी आहे.
कोरोना महामारीचे कारण सांगून गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांना बँकेत पाय ठेवू दिला नाही.

महाविकास आघाडी सरकार : 

50 % कर्मचारी बँकेत कामाला येत असल्यामुळे बँकेच्या दैनंदिन कामकाजावरही याचा विपरीत परिणाम घडून आलेला आहे.

रासायनिक खते,बी-बियाणे, किटकनाशक,तणनाशक,शेतमजूर,डिझेल,पेट्रोल,ट्रॅक्टर भाडे, आदींच्या किमतींमध्ये भरमसाठ वाढ झाली.

असून पीक कर्जाची रक्कम मात्र नाममात्र आहे. वास्तविक पाहता ही महागाई, हा उत्पादन खर्च लक्षात घेऊन पीक कर्जाच्या रक्कमेमध्ये प्रति हेक्‍टरी वाढ करण्याची गरज असल्याचे सांगत.

कारण ही सुद्धा योजना कागदावरच राहणार कारण बँका शेतकऱ्यांना अल्पभूधारक शेतकऱ्यांना पिकानुसार म्हणजे ऊस असेल तर एकरी 30 ते 40 हजार रुपये कर्ज देते.

वास्तविक पाहता एका एकराचा व्हॅल्युएशन आठ ते दहा लाख रुपये असताना केवळ तीस ते चाळीस हजार मिळत आहे.

म्हणजे अल्पभूधारक शेतकरी यांच्या पासून वंचित राहणार आणि तीन लाख रुपये कर्ज हे फक्त मुठभर लोकांना मिळणार आहे.

महाविकास आघाडी सरकारने तीन लाख रुपयांपर्यंत पीककर्ज बिनव्याजी देण्याचे घोषित केले आहे.

किमान त्याची तर अंमलबजावणी व्हावी अन्यथा सरकारवरील राहिलेला विश्वास देखील संपून जाईल.

महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना तीन लाखरुपयांपर्यंत बिनव्याजी कर्जाचे गाजर दाखवण्याचे काम केले असल्याचे त्यांनी सांगितले.

आत्ताच शेतकऱ्यांना नियमित कर्जदारांना बिनव्याजी देण्याचे निर्णय घेतला याबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा प्रकार आहे.

वास्तविक पाहता सत्तेवर आल्याआल्या नियमित शेतकऱ्यांना 50 हजार रुपये संपूर्ण अनुदान व दोन लाखापर्यंत थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार.

अशी घोषणा करून आज दोन वर्ष होत आले त्याची कोरोनाच्या नावाखाली प्रत्यक्ष अंमलबजावणी नाही.

आणि आपण काहीतरी वेगळं करतोय म्हणून तीन लाख रुपये नियमित शेतकऱ्यांना बिगरव्याजी देतोय. अशी घोषणा केली प्रत्यक्षात याची अंमलबजावणी कशी करणार म्हणून ही योजना जुनीच योजना आहे.

परंतु आपण शेतकयांसाठी नवीन काहीतरी करतोय असे दाखवण्याचा खास महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न आहे.

वास्तविक पाहता ऊस सुटल्यापासून 14 दिवसाच्या आत एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करणे बंधनकारक असतानासुद्धा आज तागायत शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे मिळाले नाही.

म्हणजे कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार आहे कारण कारखानदार आज सत्तेत आहेत तसेच शेतीला जोड धंदा म्हणून,पशूपालन व्यवसाय केला.

त्यातून शेतकऱ्याला दोन पैसे मिळतील.तरी दुधाला 18 ते 28रुपये भाव मिळत आहे. दुधउत्पादकाचा उत्पादन खर्च सुद्धा भरून निघत नाही. अशा आर्थिक संकटामध्ये शेतकरी सापडलेला आहे.

कुठल्याही शेतीमालाला भाव नाही त्यांनी शेती करावी का नाही अशा मनस्थितीत शेतकरी आहे. तसेच मार्च महिन्यामध्ये ऐन उन्हाळ्यात पिकाला पाण्याची गरज असताना शेतकऱ्याची वीज तोडण्याचे कारस्थान या सरकारने केले.

अशा प्रकारे शेतकरी विरोधी हे सरकार आहे.असेही त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यासाठी काहीतरी नवीन करत आहोत असं दाखवण्याचा केविलवाणी प्रयत्न महाविकास आघाडी सरकारने केला.

त्याचीच मोठी जाहिरात करून आम्ही शेतकऱ्यांना वाढीव तीन लाख रुपये पर्यंतचे कर्ज देणार प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कर्ज वाटप होत नाही.

तोपर्यंत शेतकरी नात्याने महाविकास आघाडी सरकारचा शेतकरी विरोधी धोरणाचा जाहीर निषेध करतो.
(अजिनाथ परबत.)

जिल्हा कार्याध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना,सोलापूर.

शासनाने जी नवीन घोषणा केली आहे यामध्ये नवीन कर्ज वाटपाचा हा विषय नसून जे शेतकरी नियमीत कर्जदार आहेत.

अशांना 3लाख रुपये पर्यंतचे जुने कर्ज असेल तर त्यांना व्याज नाही जे पहिले एक लाख रुपये पर्यंतचे बिगरव्याजी होते ते आता तीन लाखापर्यंत केलेला आहे.

एवढाच शासनाचा जीआर आहे म्हणजे मुळातच नवीन वाढीव कर्ज वाटप नाही. (सरव्यवस्थापक,किसनमोटे.सो.जि.म.सह.बॅक,सोलापूर.)

कोरोनाच्या काळात सरकारी कर्मचारी घरी बसले असताना, कोणतेही काम न करता सुद्धा त्यांचा संपूर्ण पगार चालू आहे.

अपवाद वगळता एकही आमदार-खासदार बाहेर पडलेला नसताना आमदार खासदारांचे वेतन संपूर्ण चालू आहे.

कोरोणाच्या काळात ज्याने संपूर्ण अर्थव्यवस्था तारली त्या शेतकऱ्यांना कोणतेही कारण न सांगता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी,अन50 हजार रुपये तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे.
(बळीराम गायकवाड. जिल्हासंघटक,रयत क्रांती संघटना,सोलापूर.) महाविकास आघाडी सरकार

एका माणसाने १.२ लाखात फक्त १२ आंबे विकत घेतले, त्याचे कारण जाणून घ्या ! viral Mango girl

ताज्या आणि मनोरंजक करमणुकीच्या बातम्यांसाठी : ABC मराठी न्यूजचे  Entertainment Facebook Page  ला लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा !

परंपरा विश्वासाची

🌐ABC Marathi न्यूज नेटवर्क📡

⭕👉 संपुर्ण महाराष्ट्रात जिल्हा / तालुका प्रतिंनिधी नेमने चालू आहे. इच्छुकांनी संपर्क करा !

📲7841913458

बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.

संपादक आनंद पाटील

मुख्य संपादक  – ताम्रध्वज मनाळे.

संपर्क–7841913458 / ९८३४८५८०५८

Email- abcmarathinews1@gmail.com

WebSite- www.abcmarathinews.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय