येवला तालुक्यातील सायगाव ते न्याहारखेडे रस्ता दुरुस्त करण्यासाठी चे निवेदन येवला पंचायात समितीच्या मा, सभापती लक्ष्मीबाई गरुड यांनी बांधकाम विभागाला दिले आहे, त्यापूर्वी देखील अनेक वेळा गरुड यांनी पाठपुरा करून देखील संबंधित विभागाकडून दुर्लक्ष करण्यात आले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
सायगाव ते न्याहारखेडे हा चार किलोमीटर अंतराचा रस्ता असून, त्या रस्त्याने येणारी रेंदाले ममदापूर खरवंडी कोळम भारम ई,सह, अनेक गावे जोडी जातात, परंतु त्या रस्त्याची दुरावस्था झाल्याने पूर्व भागातील अनेक गावातील ग्रामस्थांन ची अतोनात हाल होत आहे, इतकेच नाही तर न्यारखेडा येथून येणारे 100 ते दीडशे शालेय विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून प्रवास करतात ,कुठलीही जीवित हानी होण्याअगोदर संबंधित विभागाने लक्ष घालून लवकरात लवकर रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा पूर्व भागातील सर्व गावातील ग्रामस्थांसह संबंधित कार्यालया समोर उपोषण करू असे गरुड यांनी म्हटले आहे, यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे श्रावण पाटील देवरे, युवा नेते भाऊसाहेब गरुड, नवनाथ आहेर, रवी दाणे इत्यादींचे अनेक ग्रामस्थ उपस्थित होते