नाशिक जिल्हा प्रतिनिधी : शरदराव लोहकरे– नासिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या प्रशासनाने बेकायदेशीर पद्धतीने थकबाकीदार शेतक-यांच्या जमिनीवर भोगवाटदार ठिकाणी बॅंकेचे नाव लावण्याची मोहिम सुरू केली.

नासिक जिल्हा सह.बॅंकेची स्थापनाच शेतक-यांनी केली असून शेतकरी या बॅंकेचा मालक असताना मालकाला घराबाहेर काढण्याचा प्रकार आहे.या विरोधात शेतकरी संघटनेने तहसीलदार प्रमोद हिले यांना निवेदन दिले.
भारतातील एकुण थकीत कर्जदारांचा वाटा कार्पोरेट/उद्योग 74 टक्के, घरगुती 4 टक्के,सेवा 13 टक्के,शेतकरी फक्त 9 % असताना शेतक-यांच्याच आत्महत्या का होतात? कार्पोरेट आणि उद्योग क्षेत्राताचा वाटा 74 टक्के असून ते परदेशात फरार होतात.

या उलट शेतकरी जिल्हा सह.बॅन्केचा मालक असताना सुलतानी,असमानी संकटामुळे कधी शेतमालाची निर्यात बंदी,अनावश्यक आयात, कोरोणा जागतिक महामारी, संकटांचा सामना करत असतांना शेतीमाल रस्त्यावर फेकून द्यावा लागला आजही कांदा भाव पडल्यामुळे शेतकरी अर्थिक संकटात सापडला आहे.

नासिक जिल्हा सह बॅन्क कर्ज वसूली साठी शेतक-यांच्या जमिनीच लुटायला लागल्याने देशाच्या पोशिंद्याची झोपच उडली असून डोळ्यासमोर फक्त अंधार दिसत आहे.

म्हणून सर्व शेतकरी संघटनांनी एकत्रित येऊन शेतक-यांना बरोबर घेऊन जिल्हा सह बॅन्केच्या कारवाई विरोधात नासिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादासाहेब भूसे यांच्या घरावर शेतकरी भव्य बि-हाड मोर्चा काढुन आंदोलन करणार आहे.

या आंदोलनात मार्ग न निघाल्यास महाराष्ट्र भर सर्व शेतकरी संघटना एकत्र येऊन तिव्र आंदोलन उभारले जाईल असा ईशारा निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे. निवेदनावर शेतकरी संघटनेचे नेते संतु पाटील झांबरे, बापूसाहेब पगारे, बाळासाहेब गायकवाड, अरूण जाधव, महिला आघाडीच्या संध्या पगारे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे श्रावण देवरे, दत्तात्रय गायकवाड, बाळासाहेब साताळकर, बापू सरोदे, संजय पटेल सह्या आहेत.

 

https://www.youtube.com/watch?v=SSOXWgrj6pU

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय