बुलडाणा तालुक्यातील डोंगर खंडाळा येथे सुनील चव्हाण यांच्या घरात रात्री पाण्याच्या टाकीमध्ये विषारी साप आढळून आला. सुनील चव्हाण यांनी तात्काळ सर्पमित्र रसाळ यांना फोनद्वारे माहिती दिली. रसाळ यांनी डोंगर खंडाळा येथे पोहोचून या सापाला पाण्याच्या टाकीतून बाहेर काढलं. मात्र हा साप जेव्हा बाहेर काढला तेव्हा त्याने काहीतरी खाल्ल्याने तो सुस्त असल्याचं पाहायला मिळत होतं.
ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा
नंतर जेव्हा या सापाला बाहेर काढण्यात आलं तेव्हा त्याच्या तोंडातून आणखी एक साप बाहेर निघाला. या विषारी सापाने दुसऱ्या एका सापाला गिळंकृत केलं होतं. या सापाच्या तोंडातून दुसरा एक साप बाहेर निघाल्याने उपस्थित सगळेच अवाक झाले. कारण आजपर्यंत सापाने इतर लहान प्राण्यांना खाल्ल्याचं अनेकांनी पाहिलं असेल मात्र हे दृश्य अतिशय दृर्मिळ आणि अवाक करणारं होतं.
बुलडाणा तालुक्यातील डोंगर खंडाळा येथे सुनील चव्हाण यांच्या घरात रात्री पाण्याच्या टाकीमध्ये विषारी साप आढळून आला. नंतर जेव्हा या सापाला बाहेर काढण्यात आलं तेव्हा त्याच्या तोंडातून आणखी एक साप बाहेर निघाला. या विषारी सापाने दुसऱ्या एका सापाला गिळंकृत केलं होतं pic.twitter.com/Pree2w3ufE
— News18Lokmat (@News18lokmat) April 1, 2023
या सापाला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.. या सापाला सर्पमित्र रसाळ यांनी रेस्क्यू करत नैसर्गिक अधिवासात सोडून जीवनदान दिलं आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. ज्यात सर्पमित्र या सापाच्या तोंडातून दुसरा साप बाहेर काढून त्याला एका प्लास्टिकच्या भांड्यात भरताना दिसत आहेत. याठिकाणी ही अजब घटना पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केल्याचंही दिसतं
हे पण वाचा :- दुर्देवीघटना : इकडं आई ज्वारी काढतं होती, तिकडं ३ भावंडानी जीव सोडला;
हे पण वाचा :- कमी भांडवलामध्ये हे व्यवसाय करा आणि मालामाल व्हा ?
हे पण वाचा :- आईच्या मर्जीविरोधात मुलीने केला विवाह, मग सगळं कुटुंबच
note:-ताज्या अपडेट साठी आमच्या व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन व्हा !