Funny Video : एका व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण विचित्र प्रकारे नाचताना दिसत आहे, ते बघून नेटकरीही चक्रावले आहेत.

Viral Dance Video : सोशल मीडियावर (Social Media) हटके आणि भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत असतात. नेटकऱ्यांचं यामुळे मनोरंजन होतं, असे व्हिडीओ तुफान व्हायरल होतात. सध्या असाच एक मनोरंजक व्हिडीओ (Funny Video) व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ आहे, लग्न समारंभातील. या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की, एक तरुण डान्स करत आहे. पण या तरुणाचा डान्स पाहून उपस्थित प्रत्येक जण चकीत झाला आहे. तुम्ही आतापर्यंत झिंगाट डान्स किंवा नागिन डान्स पाहिला असेल. पण सध्या सोशल मीडियावर या तरुणाच्या हॉरर डान्सची चर्चा आहे. आम्ही असं का म्हणतोय, ते तुम्हाला व्हिडीओ पाहिल्यावरच कळेल.

या व्हायरल व्हिडीओ तरुण जणू अचानक अंगात आल्यासारखं किंवा भूत शिरल्यासारखा नाचायला लागतो. त्याचे हात, पाय, मान अशं संपूर्ण शरीर विचित्र प्रकारच्या डान्स स्टेप मारताना तुम्हाला दिसेल. या तरुणाचा अंतरंगी डान्स पाहून बाजूला नाचणाऱ्या अनेकांची तंद्री उडाली. सर्वजण आजूबाजूला पळू लागले, काही जणांना तर तरुणाचा विचित्र डान्स पाहून हसूही आवरत नव्हतं. या तरुणाची ही करामत डान्स कमी आणि एखाद्या हॉरर चित्रपटातील सीन जास्त वाटत आहे.

पाहा तरुणाच्या अतरंगी डान्सचा व्हिडीओ

तरुणाच्या ‘हॉरर’ डान्सची चर्चा

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हा तरुण आधी एका जागी खुर्चीवर शांत बसलेला असतो. मग तो अचानक जोरजोरात मान हलवू लागतो. मग अचानक खुर्चीवरून उठून नाचत सुटतो. याला पाहून नाचणारे घाबरून दूर पळतात. मग हा तरुण नाचता नाचता खुर्चीवर आदळून जमिनीवर कोसळतो. पण एवढ्यावरही हा पठ्ठा थांबत नाही. तो त्या अवस्थेत जमिनीवर झोपूनच नाचू लागतो.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर तरुणाच्या या विचित्र डान्सचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. काही नेटकऱ्यांनी याला ‘हॉरर’ डान्स म्हटलं आहे. नेटकऱ्यांच्या व्हिडीओवर तुफान प्रतिक्रिया येत आहेत. हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून अनेकांनी व्हिडीओला लाईक आणि शेअर केलं आहे. हा व्हिडीओ videonation.teb या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे.

 

विद्युत खांबावरील तार तुटून पाच वर्षाच्या चिमुकल्याचा करंट लागून मृत्यू ! वाचा सविस्तर !

धक्कादायक बातमी! वांग्याची भाजी का केली नाही म्हणून पत्नीला रॉकेल टाकून पेटवले ?

शारीरीक संबध – रेखाचे हे विधांन ऐकून लोकांची झोप उडाली होती; वाचून तुम्हालापण धक्का

परंपरा विश्वासाची

बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.

संपादक – ताम्रध्वज मनाळे.

संपर्क–7841913458 / ९८३४८५८०५८

Email- abcmarathinews1@gmail.com

WebSite- www.abcmarathinews.com

🌐ABC Marathi न्यूज नेटवर्क📡

VIDEO : मेरी शादी करवाओ! तरुणामागे पळत सुटली तरुणी; लग्नासाठी भररस्त्यात ड्रामा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय