इंदापूर प्रतिनिधी: vijay naval patil
आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन तर्फे देण्यात येणारा विदर्भ गौरव पुरस्कार योगाचार्य विजय नवल पाटील यांना प्रदान करण्यात आला. इंदापुरातील विद्या प्रतिष्ठान संस्थेतील उत्कृष्ट शिक्षक योगाचार्य विजय नवल पाटील यांना मा. श्री डॉ. रणजीत पाटील ( मा. गृहमंत्री /मा. पालकमंत्री अकोला) व डॉ. नितीन राजे पाटील (राष्ट्रीय उपाध्यक्ष) डॉ. दिशा चव्हाण, डॉ. प्रवीण जोशी (सह-संचालक MSME राजकोट, भारत सरकार) मेजर विकास दाहिया- नेव्ही भारत व इतर मान्यवरांच्या शुभ हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सध्याच्या काळात योग आणि वैद्यकीय क्षेत्रात भरघोस कामगिरी केल्याबद्दल या पुरस्कारासाठी त्यांची निवड झालेली होती.
आयुषच्या माध्यमातून विजय नवल पाटीलांनी ऑनलाईन पद्धतीने ५००० पेक्षा अधिक लोकांना मोफत योग प्राणायामाचे धडे दिले.
योग व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हा अवार्ड देण्यात येतो. आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन हे एक जागतिक स्तरावरील आरोग्य क्षेत्रात काम करणारे सात 7 पॅथीचे संघटन असून यात आयुर्वेद, होमिओपॅथी, सिद्ध, युनानी, ॲक्युपंचर, ॲक्युप्रेशर तसेच योग & नॅचरोपॅथी यांचा समावेश होतो. नवल पाटील हे योगाचे पुणे जिल्हाध्यक्ष आहेत. भविष्यात महाराष्ट्राची जबाबदारी येऊ शकते.
१० एप्रिल २२ रोजी हॉटेल कृष्णा कॉटेज, शेगांव (बुलढाणा) येथे हा पुरस्कार वितरित करण्यात आला. त्यासाठी सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.