आदर्श शिक्षक पुरस्कार योगाचार्य श्री विजय नवलपाटील यांना प्रधान.

क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त- शिक्षक दिनानिमित्त आदर्शशिक्षक पुरस्कार सोहळा 2021 दिनांक 28 नोव्हेंबर 2021 रोजी उत्साहात पार पडला. मराठा सेवा संघ, इंदापूर च्या वतीने महात्मा जोतिबा फुले यांचा स्मृती दिन दि. २८ नोव्हेंबर हा खरा शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो. म.जोतिबा फुले यांनी बहूजन समाजाला शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी आयुष्य भर महान कार्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या नावाने शिक्षकदिन साजरा करणे योग्य आहे. क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त मराठा सेवा संघाच्या वतीने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विद्या प्रतिष्ठान संस्थेतील गणित शिक्षक योगाचार्य विजय नवल पाटील यांना सपत्नीक आदर्श शिक्षक पुरस्कार इंदापूर येथे प्रदान केलेला आहे.


कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रा. शिवश्री भास्कर गटकुळ, डॉ. जयश्री गटकुळ जिल्हा अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड, जयश्री खबाले, शिवश्री राहुल घोगरे तालुका अध्यक्ष मराठा सेवा संघ, प्रा. शिवश्री गणेश रणदिवे, डॉ. सुवर्णा नवल, मीडिया प्रमुख शिवश्री सागर जाधव व इतर मान्यवर कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते.


विद्या प्रतिष्ठान शाळेच्या प्राचार्या ज्योती जगताप, सहकारी शिक्षक, पालक व परिसरातील ग्रामस्थ यांच्याकडून विजय नवल पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय