इंदापूर प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परीषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे द्वारा आयोजित जिल्हास्तरीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्ध्येचे आयोजन राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ५ , दौंड येथे दि.1 व 2 डिसेंबर 2022 रोजी करण्यात आले या स्पर्धेचे उद्घाटन विनिता साहू ( आयपीएस ) समदेशक ( camandent ) यांच्या शुभहस्ते झाले. इंदापूर तालुक्यातील विविध वयोगटामध्ये 12 हून जास्त खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला होता.
स्पर्धेत पदक विजेते खेळाडू खालील प्रमाणे –
इंडियन राऊंड मुली १४ वर्षे गट
१) राजनंदिनी हणमंत बोडके
🥇 गोल्ड मेडल – ३० मीटर
🥈सिल्व्हर मेडल – २० मीटर
🥇 गोल्ड मेडल – ओवर ओल
कॅम्प्पाउंड राऊंड मुले १४ वर्षे गट
१) कृष्णा दत्तात्रय गार्डे
🥇 गोल्ड मेडल – ५० मीटर
३) वीरेंद्र पप्पुलाल घोडके
🥉 ब्राँझ मेडल – ४० मीटर
४ था क्रमांक – ३० मीटर
🥉 ब्राँझ मेडल – ओवर ओल
फिटा ( रिकर्व ) राऊंड मुले १७ वर्षे गट
३) अनस माजीदखान पठाण
४ था क्रमांक- ६० मीटर
🥉ब्राँझ मेडल – ३० मीटर
४ था क्रमांक – ओवर ऑल
सर्व खेळाडू प्रचार्या ज्योती जगताप मॅडम, श्री मच्छिन्द्र साळुंखे तसेच रोशन अकॅडेमी चे जुबेर पठाण* यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर शहरात धनुर्विद्या ( आर्चरी ) चा सराव करतात. जिल्हा क्रीडा अधिकारी शिल्पा चाबूकस्वार यांच्या हस्ते खेळाडूंना पारितोषिक वितरण झाले. विद्या प्रतिष्ठांचे इंदापूर इंग्लिश मेडीयम स्कूलच्या प्रचार्या, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणी पालक यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
डॉ. सुवर्णा विजय नवल पाटील आयमा _ॲक्युपंचर स्टार_ पुरस्काराने सन्मानित