इंदापूर: विद्या प्रतिष्ठान इंदापूर इंग्लिश मीडियम स्कूल इंदापूर मध्ये गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम उत्साहात संपन्न कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या प्राचार्या ज्योती जगताप व इन्चार्ज अनुराधा इनामदार यांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून झाली, यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान केला.

गुरूंचे महत्त्व पटवून देण्यासाठी विद्यालयातील इयत्ता चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांनी भाषण व ग्रीटिंग कार्ड बनविणे तर आठवीच्या विद्यार्थ्यांनी सुविचार,नुक्कड नाटक, गायन, आणि डान्स अशा विविध कलागुणांमधून त्यांनी आपल्या गुरु विषयी आदर व्यक्त करून पर्यावरण, निसर्ग, पशू-पक्षी, पुस्तके, इंटरनेट, संगणक, शाळा, शिक्षक अशा सर्व सजीव, निर्जीव गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करू, अशी ग्वाही दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सबिया पठाण व ओजल शहा यांनी तर कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाच्या प्राचार्या ज्योती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. रामदास काटे,मच्छिंद्र साळुंखे आणि पल्लवी दिवसे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय