आज शेतकरी शेतीकडे व्यवसाय म्हणून बघत आहेत. वाढती लोकसंख्या आणि मोठ्या प्रमाणात वाढणारी बेरोजगारी हे अतिशय गंभीर विषय बनला आहे. त्यामुळे शेतकरी पण कमी क्षेत्रात कस जास्त उत्पन्न घेता येईल असे नव नवीन प्रयोग करताना दिसत आहेत. त्यात काहींना यश मिळत तर काहींना आर्थिक नुकसान होत. अहमदनगर जिल्ह्यातील कोरेगव्हाण (ता.श्रीगोंदा) गावातील श्री युवराज आढाव यांनी वाल लागवड माहिती घेऊन (val lagwad mahiti) 6 लाख उत्पन्न फक्त 20 गुंठेत मिळवले आहे.
युवराज यांनी कशा पद्धतीने वाल लागवड केली हे सविस्तर जाणून घेणार आहोत.
भाजीपाला शेतीतून बरेच शेतकरी चांगल्या प्रकारचे उत्पन्न काढत आहेत. काहीजण आधुनिक तंत्रज्ञांन पद्धतीने भरगोस उत्पन्न काढतात, तर कोठे सेंद्रिय पद्धतीने अधिक उत्पन्न काढून पैसे मिळवले जातात.
आज आपण वाल लागवड/घेवडा लागवड शेतीची सविस्तर माहिती घेणार आहोत. वाल लागवडीसाठी उत्तम निचरा होणारी हलकी भारी काळी जमीन चालते. सहा फूट अंतरावर ती बेड तयार करून घ्यावेत.
हे पण वाचा -एका माणसाने १.२ लाखात फक्त १२ आंबे विकत घेतले, त्याचे कारण जाणून घ्या ! viral Mango girl
वाल लागवड/पावटा लागवड :-एकरी बेसल डोस मध्ये खालील पद्धतीने वापर करा.
शेणखत
2 ट्रॉली
10/26/26
2 बॅग
15/15/15
2 बॅग
बोराकॅलमॅक्स
30 किलो
ह्युमिकींग
20 किलो
कार्बोफ्युरॉन
5 किलो
सल्फर
10 किलो
सेंद्रिय किंवा जैविक खते
150 किलो
इत्यादी खते बेडमध्ये टाकावे बेडवर ठिबक सिंचन अंथरूण बेड ओला करून घ्यावा. दुसऱ्यादिवशी मल्चिंग पेपर अंथरून घ्यावा.
2 फूट अंतरावर झिक झ्याक पद्धतीने होल मारून टोकण पद्धतीने लागवड करावी.
एक एकर वाल लागवडीसाठी 2 किलो बियाणे लागते लागवडीनंतर 21 दिवसांनी मंडप तयार करावा तार 16 गेज ची असावी.
दहा फूट अंतरावर दोन बांबूंची कैची तारेला द्यावी सुतळीच्या साह्याने वेलीला मंडप वरती सोडावे. लागवडीनंतर 50 ते 60 दिवसांनी उत्पादनास सुरुवात होते.
मावा थ्रिप्स आळी करपा हे प्रमुख रोग पिकावर येतात. वालाची चांगली वाढ होऊन लवकर उत्पादन सुरू होण्यासाठी ड्रिप मधून एकरी वंडरफुल एक लिटर याप्रमाणे 21 दिवसांच्या अंतराने दोनदा सोडावे.
भरपूर प्रमाणात फुले व शेंगांचे उत्पादन मिळण्यासाठी फॉर्च्युनेटची फवारणी प्रत्येक पंधरा दिवसाच्या अंतराने करावी.
त्यामुळेच आम्ही आपल्या वाचक शेतकरी बांधवासाठी प्रगतीशील व अनुभव आलेल्या शेतकर्यांच्या यशोगाथा नेहमी घेऊन येत असतो.