इगतपुरी शहर (जि.नाशिक) : इगतपुरी तालुक्यामध्ये बांधण्यात आलेल्या अप्पर वैतरणा (vaitarna dharan ) या धरणासाठी ची संपादित जमिनीपैकी जी जमीन वापरत नाही व ती पडून आहे, अशी एकूण 623 हेक्टर अतिरिक्त मूळ मालक असलेल्या व ज्या जमिनी शेतकरी स्वतः कसत आहे. मात्र या जमिनी शासनाकडे संपादित आहेत त्या जमिनी शेतकऱ्यांना परत मिळणार आहेत.
याबाबत गुरुवारी (ता ८) विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे मंत्रालयामध्ये बैठक झाली.
या बैठकीमध्ये जलसंपदा मंत्री जयंत पाटील व जितेंद्र आव्हाड हे उपस्थित होते.
इगतपुरी तालुक्यातील वैतरणा धरणातील पाण्या बाहेरील जमिनी शिल्लक आहेत. त्या मूळ मालकाला परत मिळावा यासाठी आमदार हिरामण खोसकर यांनी या बैठकीचे आयोजन केले होते.
हे पण वाचा – घेवडा उत्पादकाने २० गुंठेत ६ लाख मिळवले, वाल लागवड माहिती, val lagwad mahiti
विशेष म्हणजे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी या बैठकीमध्ये महसूल विभागातील व जलसंपदा विभागातील महत्त्वाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना दिल्या.
येत्या दोन महिन्यात हा प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिलेत. अशा सूचना दिल्याची माहिती आमदार हिरामण खोसकर यांनी दिली.
वैतरणा धरणात (vaitarna dharan) संपादित झालेल्या जमिनीपैकी ज्या जमिनी वापरात नाहीत आणि त्या जमिनी स्वतः मालक कसत आहेत. त्या जमिनी मूळ मालकांना परत मिळविण्यासाठी अनेक वर्षापासून मागणी होती.
हे पण वाचा -एका माणसाने १.२ लाखात फक्त १२ आंबे विकत घेतले, त्याचे कारण जाणून घ्या !
अप्पर वैतरणा धरणाच्या कामासाठी अतिरिक्त जमीन एकूण 623 हेक्टर एकूण पंधरा गावे संपादन केली आहेत. ही जमीन अद्याप शासनाच्या नावावर आहे.
अशा जमिनी आता मूळ मालक असलेल्या स्थानिक शेतकऱ्यांना पुन्हा त्यांच्या नावावर करण्यात येईल अशी अशा आमदार खोसकर यांनी व्यक्त केली.
हे पण वाचा – OMG! 2 लाख 70 हजार प्रती किलो आंबे ! जगातील सर्वात महाग आंबा ?
महाराष्ट्रामध्ये अशी अनेक छोटी मोठी धरणे आहेत व ज्यावेळी अशा प्रकारचे धरण बांधण्यात येते त्यावेळेस बरीचशी जमीन संपादित करावी लागते. vaitarna dharan
त्यामुळे आता जलसंपदामंत्री जयंत पाटलांनी जसे आदेश इगतपुरी येथील वैतरणा धरणासाठी दिलेले आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील इतर धरणांसाठी पण असा निर्णय घेतला जाईल का ? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
फेसबूक पेज ला आत्ताच Follow करण्यासाठी क्लिक करा
“परंपरा विश्वासाची”
बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.
संपादक – आनंद पाटील
मुख्य संपादक – ताम्रध्वज मनाळे.
संपर्क–7841913458 / ९८३४८५८०५८
Email- abcmarathinews1@gmail.com
WebSite- www.abcmarathinews.com
🌐ABC Marathi न्यूज नेटवर्क📡
⭕👉 संपुर्ण महाराष्ट्रात जिल्हा / तालुका प्रतिंनिधी नेमने चालू आहे. इच्छुकांनी संपर्क करा !
📲7841913458