मौजे वडापूरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे गायरान जमीन धारकांची बैठक वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने पार पडली. बैठकीत बोलताना पुणे जिल्हा वंचित बहुजन महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. सीमाताई भालेसेन म्हणाल्या की, ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गायरान जमीन धारकांच्या न्याय हक्कासाठी समन्वय समिती स्थापन करण्यात आली असून त्यासाठी आवश्यक असणारी माहिती घेण्यासाठी मनिषा ताई चंदनशिवे यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात सुरुवात करण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त लोकांनी आपण राहत असलेल्या घराच्या जागेच्या संदर्भातील माहिती द्यावी. जेणेकरून आपल्या मागणीसाठी ही माहिती उपयुक्त ठरणार आहे.
यावेळी इंदापूर तालुक्याचे मार्गदर्शक हनुमंत तात्या कांबळे म्हणाले की, मनिषा ताई चंदनशिवे यांच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ठ काम सुरू आहे. त्यांना काम करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार तळागळात पोहचवून पक्ष वाढीसाठी लागेल ती मदत करणार असल्याचे मत व्यक्त केले.
गायरान जमीन धारक यांची माहिती घेण्यासाठी सर्व पदाधिकारी , कार्यकर्ते यांना बरोबर घेऊन संपूर्ण इंदापूर तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन त्यांची माहिती पक्ष कार्यालयात देऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे महिला अध्यक्षा सौ मनिषा ताई चंदनशिवे यांनी सांगितले.
यावेळी प्रमोद भाऊ चव्हाण म्हणाले की, गोरगरीब,शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर यांच्या वतीने आवाज उठवण्यास कोणी तयार नाही. गायरान जमीनवरील अतिक्रमण धारकांच्या घरावर थेट कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. अशा परिस्थितमध्ये कोणताही पक्ष त्यांच्या मागे उभा राहिला नाही. परंतु ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी तातडीने मुख्यमंत्री मा.ना. एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेऊन अतिक्रमण धारक यांची व्यथा मांडली व कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्यास सांगितले. त्यानंतर सरकारने तातडीने कारवाई थांबवली. आता गायरान जमीन व अतिक्रमण धारक यांची माहिती घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात गायरान जमीन व अतिक्रमण धारकांची माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे. त्या अनुसंघाने आज ह्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वांनी आपली माहिती अध्यक्षा मनिषा ताई चंदनशिवे यांच्या जवळ द्यावी. असे आवाहन केले.
यावेळी दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनी प्रतिनिधी निवडणुकीत एकमताने निवड झाल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महिला जिल्हा अध्यक्षा सीमाताई भालेसेन, महिला जिल्हा महासचिव प्रियांका ताई लोंढे, अनिता ताई गायकवाड, जयश्री सदावर्ते, महिला तालुका अध्यक्षा मनिषा ताई चंदनशिवे,ज्येष्ठ मार्गदर्शक हनुमंत तात्या कांबळे, सिद्धार्थ साळवे, नरेश भोसले, प्रमोद भाऊ चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी गया ताई मोरे, मंदाकिनी सावंत,जयश्री मोरे, नंदा सावंत,कविता चंदनशिवे,सुनीता चंदनशिवे,राणी ताई चंदनशिवे,वंदना ठोकळे, रंजना पासगे, माळी ताई, वैशाली चंदनशिवे,स्वाती चंदनशिवे,पार्वती मिसाळ, सकिना शेख, फर्जना शेख, छकुली जगताप, अश्विनी सरवदे, रीना सलवदे,दुर्गा लोखंडे, मालन चंदनशिवे, सोनाली मिसाळ, साधना मिसाळ, गुलाबराव चंदनशिवे, गोरख चंदनशिवे, सोमनाथ पवार,आनंद ठोकळे, नागेश चंदनशिवे, रणजित चंदनशिवे, दादा लांडगे, सागर चंदनशिवे, सुहानी चंदनशिवे,शुभांगी चंदनशिवे, केसर चंदनशिवे, जयश्री चंदनशिवे यांच्यासह अनेक महिला भगिनी उपस्थित होत्या.