उदगीर प्रतिंनिधी (जि.लातूर) : रागच्या भरात माणूस कोणत्या थरला जाईल हे सांगता येत नाही. आणि थोड्याश्या रागाच्या भरात केलेलं कृत्य हे किती अंगलट येत याचे उदाहरण समाजात बघत असतो.

अशीच एक घटना उदगीर (जि. लातूर) येथे घडली आहे. जेवायला वांग्याची भाजी का केली नाही? तुला जिवंत जाळतो, असे म्हणत रॉकेलची बाटली अंगावर ओतून पत्नीला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार शहरात समोर आला आहे. पत्नीस जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पतीविरुद्ध उदगीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत हाती आलेल्या माहितीनुसार आरोपी शादुल नजीर शेख याचे लग्न झाल्या पासून सतत मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता. असे मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पत्नी परवाना शादुल शेख (वय 38) मला वांग्याची भाजी जेवायला का देत नाही, तुला मी बायको म्हणून का ठेवू, तुला मी जिवंत जाळतो असे म्हणत घरात बिस्लरीच्या बाटलीत ठेवलेले रॉकेल पत्नीच्या अंगावर टाकून चूलीजवळ ठेवलेली काडीपेटी घेऊन पेटवून पत्नीच्या अंगावर टाकली.

फरजाना शेख यांच्या साडीला व अंगाला भडका होऊन पेट घेतल्याने छाती, पोट, पाठ, गळा, दोन्ही हात, हनुवटी भाजुन गंभीर जखमी झालेली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी पती विरूद्ध उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गु.र न. 211/21 कलम 307, 498(अ), 504 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक नौशाद पठाण करत आहे.

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! ईयत्ता १ली ते १२ वी पर्यंतची सर्व पुस्तके फ्री मध्ये उपलब्ध
काही सेकंदात पार्किंगमधील कार जागच्या जागी बुडाली!; धक्कादायक VIDEO समोर Car drowned in few seconds.
 

परंपरा विश्वासाची

बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.

संपादक आनंद पाटील

मुख्य संपादक  – ताम्रध्वज मनाळे.

संपर्क7841913458 / ९८३४८५८०५८

Email- abcmarathinews1@gmail.com

WebSite- www.abcmarathinews.com

🌐ABC Marathi न्यूज नेटवर्क📡

⭕👉 संपुर्ण महाराष्ट्रात जिल्हा / तालुका प्रतिंनिधी नेमने चालू आहे. इच्छुकांनी संपर्क करा !

📲7841913458

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय