uddhav thackeray malegaon speech

uddhav thackeray malegaon speech : आज मालेगाव येथील एमएसजी महाविद्यालयाच्या प्रांगणातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची तोफ धडाडली.

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात शिंदे गटातील नेत्यांसह भाजपवर यांच्यावर निशाणा साधला. गद्दारांना शिवधनुष्य पेलवणार नाही, ते धनुष्यबाण घेऊन रावणासारखे खाली कोसळतील.

आज ज्या पद्धतीने कारवाया होत आहेत, यावरून एकत्र येऊन लढणं गरजेचे आहे, राज्यातील जनतेवर सर्वकाही अवलंबून आहे. आगामी निवडणुकांमध्ये जर पुन्हा यांनाच बसवले तर नक्कीच देशात हुकूमशाही आल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला. उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील दहा महत्वाचे मुद्दे पाहूया..

1. निवडणूक आयोगाचे गांडूळ झालय. निवडणूक आयोगाला जर शिवसेना कोणाचे आहे, हे ठरवायचं असेल तर खेड आणि आजची मालेगावची सभा बघून निर्णय घ्या निवडणूक आयोगाला शिवसेना कुणाची हे लक्षात येईल.

2. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले की शिंदे गटाला 48 जागा देऊ निदान तुमच्या आडनावा एवढ्या तरी जागा द्या.

असा टोला त्यांनी यावेळी बावनकुळे यांना लगावत ठाकरे घराण्यांपासून शिवसेना तोडून दाखवा तुमचे 152 कुळ जरी आले तरी होणार नाही. निवडणूक घ्या लक्षात येईल तुम्ही मोदींच्या नावाने लढा, आम्ही बाळासाहेबांच्या नावाने लढतो.

3. स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचे दैवत आहे. त्यांचा अपमान सहन करणार नाही असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना दिला आहे. आपण देशातील लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत. पण, सावरकर यांचा अपमान सहन करणार नसल्याचे उद्धव यांनी म्हटले.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

4. आज न्यायपालिका यांच्या दावणीला बांधलेले आहेत या क्षणी केंद्राची पालखी वाहणारे न्यायपालिकेत बसतील तेव्हा आपल्याला लोकशाहीची श्रद्धांजली वाहावी लागेल हे लक्षात ठेवा.

5. भारत जोडो यात्रेत आम्ही राहुल गांधी यांच्यासोबत होतो ही लोकशाहीची लढाई असल्याने आम्ही आजही सोबत आहोत मात्र सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही लढाईचा असेल तर दैवतांचा अपमान सहन करणार नाही.

6. आज आपण सर्वजण सोबत आहोत मात्र अशा पद्धतीने दैवतांचा अपमान सहन केला जाणार नाही वेळ चुकली तर हुकूमशाही कडे गेल्याशिवाय राहणार नाही म्हणून एकत्र राहून व्यवस्थित काम करू

हे पण वाचा :- कमी भांडवलामध्ये हे व्यवसाय करा आणि मालामाल व्हा ?

7. आपल्याला एकी फोडण्यासाठी आपल्याला दिवसण्यासाठी हे सगळं कुरघोडीचं राजकारण सुरू आहे त्यामुळे त्यांच्या आरोप प्रत्यारोपांना बळी पडू नका, आपलं काम करत राहा असा सल्ला राहूल गांधी यांना दिला आहे.

8. आगामी 2024 च्या निवडणुकांमध्ये हे पुन्हा बसले तर पुन्हा निवडणूक होणार नाही आणि लोकशाही संपली असं समजून घ्या माझी लढाई ही मुख्यमंत्री होण्याची नाही तर लोकशाही टिकवण्यासाठी आहे म्हणून तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे.

हे पण वाचा :- आईच्या मर्जीविरोधात मुलीने केला विवाह, मग सगळं कुटुंबच

9. श्रीकृष्णाने गोवर्धन उचलला होता त्यावेळी इतर सवंगड्यांनी सोबत दिली होती अशाच प्रकारे शिवसेनेला साथ द्या एवढे जर लाखो हात सोबत आले तर या गद्दारांपासून कितीतरी वर आपला गोवर्धन उचला जाईल.

10. हे गद्दार आपले स्वातंत्र्य घ्यायला निघाले आहेत. पुन्हा एकदा गुलामगिरी लाजायला बघत आहेत काही दिवसांनी तुमच्याकडे चोर धनुष्यबाण घेऊन येतील. त्याला बळी पडू नका त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका ही जिद्द, हे प्रेम आणि हा विश्वास असाच कायम ठेवा. तुमच्या ताकदीच्या जोरावर मी लढायला उभा आहे.uddhav thackeray malegaon speech

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय