नाशिक जिल्हा प्रतिनिधी : शरदराव लोहकरे

मौजे तळेगाव रोही येथील ग्रामपंचायत उपसरपंच पदाच्या निवडणुकीकरिता दीपक ठाकरे यांनी नामनिर्देशन पत्र सादर केले व सौ. शोभा रोकडे यांनी माऊली पॅनल तर्फे नामनिर्देशन पत्र दाखल केले होते.

सौ शोभा रोकडे यांना माऊली पॅनलच्या ७ ग्रामपंचायत सदस्यांनी मते मते देऊन एकमताने विजयी केले. तसेच दीपक ठाकरे यांना श्रीराम पॅनलच्या ६ सदस्यांनी मते टाकले. दीपक ठाकरे यांचा एकमताने पराभव झाला. थेट सरपंच भाऊसाहेब जिरे हे अध्यक्षस्थानी होते. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी रावसाहेब पाटील, ग्रामविकास विकास अधिकारी सुभाष गवई, गावचे पोलीस पाटील अविनाश अहिरे, पोलीस कॉन्स्टेबल पवार साहेब यांनी पारदर्शक पणे निवडणूक घेतली.
यावेळी पॅनलचे नेतृत्व करणारे ज्ञानेश्वर माऊली वाकचौरे, बबन वाकचौरे, सिताराम ठाकरे, अंबादास केदारे , कॉ. सुखदेव बाबा केदारे, बाळू गीते ,शिवाजी वाकचौरे, अन्वर पठाण , लालू मोरे , श्रावण मोरे , धनाजी मोरे, प्रकाश वाकचौरे, दिवाकर केदारे शिवाजी वाकचौरे, रेवन सोनवणे, मधुकर वाकचौरे, विश्वास वाकचौरे तसेच गावातील सर्व ग्रामस्थ व माऊली पॅनलचे सर्व समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते.

तळेगाव रोही मध्ये उपसरपंच पदाच्या पळापळीचे राजकारण

परिवर्तन माऊली पॅनलच्या राजकीय विरोधकांनी माऊली पॅनल चा एक सदस्य पळविण्यात यश मिळविले होते. परंतु परिवर्तन माऊली पॅनलच्या कार्यकर्त्यांनी अतिशय हुशारीने विरोधी पॅनलचा एक सदस्य शेवटच्या रात्री मध्ये आपल्या ताब्यात घेण्यात यश मिळवले. त्यानुसार परिवर्तन माऊली पॅनल थेट सरपंच पदाचे दोन मते अधिक पाच सदस्य असे एकूण सात मध्ये गोळा बेरीज करून परिवर्तन माऊली पॅनल ने उपसरपंच पदाची निवडणूक जिंकविण्यात यश मिळविले. या सर्व पळवा पळवीच्या राजकारणात तळेगाव रोही ग्रामपंचायत उपसरपंच पदाच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय