आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन तर्फे दिला जाणारा यंदाचा स्टार ॲक्युपंचर अवॉर्ड डॉ. सुवर्णा विजय नवल पाटील यांना केंद्रीय अर्थ राज्य मंत्री श्री. भागवत कराड, जगप्रसिद्ध कायरोप्रॅक्टर रजनीकांत, आयुषचे डॉ नितीन राजे पाटील, डॉ सतीश कराळे, डॉ. दिशा चव्हाण यांच्या हस्ते 27 नोव्हे 2022 रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, औरंगाबाद (छ. संभाजीनगर) येथे प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाला भारतातून महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, पंजाब, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, गुजरात अशा 8 राज्यातील 300 पेक्षा जास्त पुरस्कर्ते यावेळी उपस्थित होते.
डॉ. सुवर्णा नवल पाटील ह्या योग निसर्गोपचार बरोबर ॲक्युपंचर थेरपी चांगल्या प्रकारे इंदापूर (पुणे) येथे प्रॅक्टिस करत आहेत.
ही दुष्परिणाम रहित पारंपारिक चिकित्सा पद्धती असल्यामुळे याचा मणके दुःखी, कंबर दुःखी सारख्या असह्य वेदना होणाऱ्या रुग्णांना खूप फायदा होत आहे.
या पुरस्कारामुळे डॉ नवल पाटील यांचे सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.