नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण सोयाबीन लागवड soybean lagwad kashi karavi विषयी माहिती पाहणार आहोत. आपल्या उत्पादनामध्ये जास्तीत जास्त नक्कीच होणार त्यासाठी आपणाला हा संपूर्ण लेख वाचवा लागेल.
शेतकरी मित्रानो आपण या लेखात उत्पाद्कता वाढवण्याचे उपाय ,सुधारित वाण, जमीन, हवामान, सोयाबीन पीकसाठी जमिनीची पूर्वमशागत कशी करावी, सोयाबीनची पेरणी कधी आणि कशी करावी, आंतरपीक पद्धती कश्या वापराव्यात, खत व्यवस्थापन, आंतरमशागत इत्यादी गोष्टींची माहिती पाहणार आहोत.
सोयाबीन हे पिक कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन देणारे पीक आहे. सोयाबीन प्रामुख्याने खरीप हंगामात घेतले जाणारे पीक आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाची लागवड फार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तसेच सोयाबीन हे महत्वाचे तेलबिया पिक म्हणूनही ओळखले जाते. सोयाबीनमध्ये ४० टक्के प्रथिने आणि १९ टक्के खाद्यतेल असल्यामुळे प्रामुख्याने सोयाबीनची शेती जास्त प्रमाणात केली जाते. एकूण प्रथिनांपैकीं ६० टक्के प्रथिने सोयाबीनपासून तयार होतात. तसेच सध्या बाजार भाव पण चांगला प्रतीचा मिळत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवानो यावर्षी उत्पन्न जोरात काढायचे आहे.
सोयाबीन पिक घेतल्यानंतरचा राहिलेला उर्वरित भाग हा जनावरांसाठी पौष्टिक आहार म्हणून उपयोग केला जातो. सोयाबीनपासून बिस्कीट , सोयामिल्क, सोयावडीसारखे १०० उपपदार्थ तयार करता येतात . त्याचा पालापाचोळा जमिनीवर पडल्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो. सोयाबीनला हे पीक फायदा देणार आहे.
हे पण वाचा- चंदन शेती करोडोचे उत्पन्न देणारे पीक !
सोयाबीनची कमी उत्पाद्कता असण्याची प्रमुख कारणे.
- आधुनिक लगवड़ तंत्रज्ञानाचा अवलंब न करणे.
- सुधारीत जातींचा वापर न करणे.
- दर हेक्टरी झाडांचीसंख्या न राखणे.
- बीजाक्रिया न करण, उगवणशक्तीची तपसणीं न करणे.
- योग्य खत मात्रांचा शिफारशीनुसार वापर नकरणे.
- तण तसेच कीड व रोगांचा बंदोबस्त वेळेवर न करणे.
- आंतरपीक पद्धतींचा वापर नकरणे.
जमिन:
- उत्तम निचरा असणारी व मध्यम काळी पोयट्याची, सेंद्रिय युक्त जमिनीत हे पीक चांगले येते. सोयाबीनची लागवड ४.५ ते ८.५ च्या पीएच (सामु) असलेल्या जमिनीत करावी.
- सोयाबीन पीकसाठी जमिनीची पूर्वमशागत कशी करावी?
- पेरणीपूर्वी जमीन खोल नांगरुन चांगली भुसभुशीत करावी. त्यानंतर त्यामध्ये चांगलं कुजून गेलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी २५ ते ३० गाड्या वापराव्या
- हिवाळी पीक काढल्यावर लगेच उन्हाळी नांगरट करावी.
- २-३ कुळवाच्या पाळ्या देऊन जमिन भुसभुशीत करावी.
- हेक्टरी २५ ते ३० गाड्या कुजलेले शेणखत शेवटच्या कुळवाच्या अगोदर मातीत मिसळून घ्यावे आणि जमिन पेरणीसाठी तयार करून घ्यावी.
पेरणीची वेळ:
सोयाबीनची लागवड जुन ते जुलै महिन्यात करावी.
लागवड करताना पावसाचा अंदाज घेवुन लागवड करावी. पेरणीनंतर जास्त काळ राहणारा कोरडा काळ सोयाबीन पीकासाठी हानीकारक ठरतो. अशा कोरड्या काळामध्ये रोपांची मर होण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मान्सुन व्यवस्थित स्थिर झाल्यानंतरच पेरणी करावी.
सुधारित वाण
- एम.ए.सी.एस.१३,एम.ए.सी.एस.५८ ,एम.ए.सी.एस.१२४ ,एम.ए.सी.एस.४५०,एम.ए.सी.एस.११८८,फुले कल्याणी (डी.एस.२२८),फुले अग्रणी ,जे.एस.९३-०५ ,जे.एस ९७-५२ , जे.एस ९५-६० ,एन.सी.आर ३७ एम.ए.यु.एस.-४७ , एम.ए.यु.एस.-६१,एम.ए.यु.एस.६१-२, एम.ए.यु.एस.-७१,एम.ए.यु.एस.-८१, एम.ए.यु.एस.-१५८,जे.एस.३३५, टीए.एम.एस.९८-२१
बियाणे प्रमाणे – सोयाबीनची उगवणशक्ती ७० टक्केच्यावर असल्यास हेक्टरी ७५ किलो बियाणे वापरावे.
सोयाबीनमध्ये आंतरपीक पद्धती कश्या वापराव्यात?
सोयाबीन पिकामध्ये ५ प्रकारे आंतरपीक पद्धतीचा वापर करू शकतो. त्या पद्धती खालीलप्रमाणे असणार आहेत.
- सोयाबीन आणि तूर यांची पेरणी.
- सोयाबीन आणि कपाशी यांची पेरणी.
- सोयाबीन आणि ज्वारी यांची पेरणी.
- सोयाबीन आणि भुईमूग यांची पेरणी.
- सोयाबीन आणि बाजरी यांची पेरणी.
बीजप्रक्रिया
- उग्वणीच्या काळात बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होण्यासाठी जैविक बुरशीनाशके किंवा बुरशीनाश्कांची बीजप्रक्रिया आवश्यक आहे. त्यासाठी पेरणीपूर्व प्रती किलो बियाण्यास ३ ग्रम थायरम किंवा २ ग्रॅम थायरम २.५ ग्रॅम बाविस्टीन व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. तसेच सोयाबीन पिकास रायझोबीयम जॅपोनिकम व स्फुरद विरघळणारे जिवाणू यांची प्रत्येकी २५० ग्रॅम/१० किलो बियाणे याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी व बियाणे सावलीत वाळवून पेरणीस वापरावे. बीजप्रक्रिया करताना बियाणे हलक्या हाताने चोळावे तसेच प्रथम बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया करावी व नंतर जैविकखताची बीजप्रक्रिया करावी.
पेरणी अंतर:
- भारी जमिन: दोन ओळीत अंत ४५ से.मी. आणि दोन रोपांतील अंतर ५ सें.मी.
- मध्यम जमिन: दोन ओळीत अंतर ३० से.मी. आणि दोन रोपांतील अंतर १० सें.मी.
बियाणे प्रमाण:
- सलग पेरणी साठी: ७५-८० किलो प्रती हेक्टर बीज वापरावे.
- टोकन पेरणी साठी: ४५-५० किलो प्रती हेक्टर बीज वापरावे.
खत व्यवस्थापन
- सोयाबीन पिकास हेक्टरी ५0 किलो नत्र + ७५ कि. स्फुरद + ३०
- सोयाबीन पिकास हेक्टरी ५0 किलो नत्र + ७५ कि. स्फुरद + ३० किलो गंधक पेरणीपूर्वी किलो गंधक पेरणीपूर्वी किंवा पेरणीच्या वेळी द्यावे. जमिनीत जस्त या अन्नद्रव्याची कमतरता असल्यास २५ किलो झिंक सल्फेट पेरणीच्यावेळी द्यावे. तसेच उत्पादन वाढीच्या दृष्टीने १० किलो बोरॅक्स प्रति हे. पेरणीच्यावेळी द्यावे.
आंतरपीक पद्धतीचा वापर करणे
कोरडवाहू शेती पद्धतीत सोयाबीन पुष्कळदा सलग पीक म्हणून घेतात, परंतु आपण सलग पीक न घेता आंतरपीक पद्धतीचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे, याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
- बेभरवशाचे तसेच कमी पर्जन्यमान व ज्या ठिकाणी दुबार पीक घेऊ शकत नाही अशा ठिकाणी आंतरपीक पद्धतीपासून शाश्वत व स्थिर उत्पन्न मिळण्याची शक्यता अधिक असते.
- प्रतिकूल परिस्थितीतही कोणत्याही एका पिकाचे उत्पन्न हमखास मिळते.
- आंतरपिकात सोयाबीनसारख्या द्विदलवर्गीय पिकाचा समावेश असल्यास हवेतील नत्र जमिनीत स्थिर होण्यास मदत होते.
- आंतरपीक पद्धतीचा अवलंब केल्यास तणांच्या वाढीस आळा बसतो. तसेच रोग व किडींचे प्रमाण कमी आढळून येते.
- जनावरांकरिता सकस चारा उपलब्ध होतो.
- आंतरपिकातील सोयाबीन सारखे नगदी पीक शेतक-यांच्या आर्थिक अडचणी दूर करु शकते.
- तूर + सोयाबीन सारख्या आंतरपीक पद्धतीचा अवलंब केल्यास देशातील डाळ व तेलवर्गीय पिकांचे उत्पादन वाढून तेल व डाळीची कमतरता भरून निघेल.
आंतरपीक पद्धती
- तूर + सोयाबीन (१:२)
- कपाशी + सोयाबीन (१:१)
- सोयाबीन + भुईमूग (१४, १:६)
- सोयाबीन + ज्वारी (१:२, २:२)
- सोयाबीन + बाजरी (२:४, २:६)
आंतरमशागत
- सोयाबीन पिकास सुरवातीचे ६-७ आठवडे हे तण वाढीच्या दृष्टीने संवेदनक्षम असल्याने सुरवातीला पीक तणविरहीत ठेवणे अधिक उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. त्यासाठी २०-३० दिवसांनी एक कोळपणी तर ४५ दिवसांनी दुसरी कोळपणी द्यावी. त्याचबरोबर गरजेनुसार १-२ खुरपण्या देऊन पीक तणविरहीत ठेवावे. तण नियंत्रणाच्या दृष्टीने रासायनिक तणनाशकामुळे चांगल्याप्रकारे सोयाबीनमधील तणांचा बंदोबस्त झाल्याचे दिसून येते.
कीड व रोग व्यवस्थापन
सोयाबीनवर महाराष्ट्रात आढळणा-या किडीच्या नियंत्रणासाठी खालील उपाययोजना करावी
अ) कोड नियंत्रण
खोड माशी
क्लोरोपायरीफॉस २0 टक्के इसी १.५ लि. प्रति है. किंवा ट्रायझेफॉस ४० टक्के इसी ८oo मि.ली. पेरणीनंतर ८ ते १० दिवसांनी आणि पीक फुलो-यात असताना ५oo-७o० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे.
पाने पोखरणारी अळी
पाण्यात मिसळणारी ५० टक्के कार्बारील भुकटी प्रती हेक्टरी २ किलो ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावी.
पाने खाणा-या आणि पाने गुंडाळणा-या अळ्या
- क्रिनॉलफॉस २५ इसी १.५ ली.
- ट्रायझोफॉस ४o इसी ८oo मि.ली.
- मेथोमिल ४0 टक्के एसपी १ कि. ग्रैं.
- क्लोरोपायरीफॉस २o इसी १.५ ली.
- इथोफेनप्रॉक्स १o इसी १ ली.
- इंडोक्झाकार्ब 300 मि.ली.
- लम्बडा सायद्देलोश्चिन ५ टक्के सीएस ३oo मि.ली.
- स्पिनोसॅड ४५ एसी १२५ मि.ली.
- इमामेक्टिन बेंझोएट ५ टक्के डब्लुजी १५० ग्रॅम यापैकी एका किटकनाशकाचा प्रती हेक्टरी ५००-७०० लीटर पाण्यात मिसळून फवारणीसाठी आलटून पालटून वापर करावा.
हे पण वाचा – एका माणसाने १.२ लाखात फक्त १२ आंबे विकत घेतले, त्याचे कारण जाणून घ्या
रस शोषणा-या किडी (मावा, तुडतुडे, हिरवा ढेकूण इ.)
मेथिल डिमेटॉन २५ इसी ६oo मि.ली. किंवा फॉसफॉमिडॉन ८५ इसी २oo मि.ली. किंवा मोनोक्रोटोफॉस ३६ एस सी ८oo मि.ली. यापैकी एका कीटकनाशकांचा प्रती हेक्टरी ५00 लीटर पाण्यात मिसळून फवारा द्यावा.
हुमणी
पावसाळ्याच्या सुरुवातीस कडुनिंब व बाभळीच्या झाडावर किटकनाशकांचा फवारा देऊन मुंगेच्यांचा नाश करावा. शेतात शेणखत पसरण्यापूर्वी त्यात असलेल्या हुमणीच्या अंडी व अळ्यांचा नाश करण्यासाठी १० टक्के फॉलिडॉल भुकटी मिसळावी. शेतात मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळल्यास ५ टक्के क्लोरेडेन किंवा ५ टक्के हेप्टाक्लोर भुकटी प्रती हेक्टरी ६५ केिली जमिनीत मिसळावी.
ब) रोग नियंत्रण
या पिकावर केवडा, तांबेरा, देवी, मूळकुजव्या इ. रोग येतात. या रोगाच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हेक्झाकोनेझोल ५ इसी १ लिटर (प्रतिबंधात्मक) आणि रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास दुसरी फवारणी प्रॉपिकोनेझोल २५ इसी १ लिटर या बुरशीनाशकांची प्रती हेक्टरी १ooo लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पीक वाढीच्या महत्वाच्या अवस्था खालील प्रमाणे:
- पीकाला फांद्या फुटताना म्हणजेच पेरणी नंतर ३० ते ३५ दिवसांनी.
- पीक फुलोऱ्यात असताना म्हणजेच पेरणी नंतर ४५ ते ५० दिवसांनी.
- शेंगा भरताना म्हणजेच पेरणी नंतर ६० ते ६५ दिवसांनी.
- पीक वाढीच्या महत्वाच्या अवस्थेमध्ये जर पावसाने ताण दिला तर पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
हे पण वाचा – OMG! 2 लाख 70 हजार प्रती किलो आंबे ! जगातील सर्वात महाग आंबा ? सविस्तर माहिती जाणून घ्या!
काढणी:
- लागवड केलेल्या जातीच्या पक्वतेच्या कालावधी नुसार ९० ते ११५ दिवसात काढणी करावी.
- सोयाबीनच्या शेंगांचा रंग तांबूस झाल्यानंतर तसेच पान गळती सुरु झाल्यावर पीक काढणीस सुरवात करावी.
- पीक काढण्यास उशीर झाल्यास दाने गळण्यास सुरवात होते.
soybean lagwad kashi karavi मित्रांनो अश्याप्रकाकरे सोयाबीनचे व्यवस्थापन केल्यास तुम्हाला नक्कीच उत्पादनात वाढ दिसून येणार आहे आणि अधिक नफा मिळणार आहे. तुम्हाला माहित कशी वाटली याची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत कंमेंटद्वारे पोहचावा.
फेसबूक पेज ला आत्ताच Follow करण्यासाठी क्लिक करा
घेवडा उत्पादकाने २० गुंठेत ६ लाख मिळवले, वाल लागवड माहिती, val lagwad mahiti