बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या घरात चिमुकल्याचे आगमन झाले आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर आणि उद्योगपति आनंद आहुजा  यांच्या घरात चिमुकल्याचे आगमन झाले आहे. सोनम कपूरने आज म्हणजेच (20 ऑगस्ट 2022) रोजी बाळाला जन्म दिला आहे.  बऱ्याच दिवसांपासून सोनमच्या प्रेग्नेंसीबाबत सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगत होत्या. मात्र, आता ‘मॉम टू बी’ सोनम आता आई झाली आहे. त्यामुळे, अर्थातच सोनमला चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

सोनम कपूरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून तिच्या चाहत्यांना ही गुड न्यूज दिली आहे.

यामध्ये सोनम कपूरने असे म्हटले आहे की, आज 20 ऑगस्ट 2022 रोजी आम्ही आमच्या लहान बाळाला जन्म दिला. आमच्या या प्रवासात आमच्यामागे खंबीरपणे उभे असणारे डॉक्टर्स, नर्स, मित्र-परिवार आणि कुटुंबियांचे मी आणि आनंद आम्ही मनापासून आभार मानतो. आमचा नवीन प्रवास आजपासून सुरु झाला आहे. पण, यामुळे आमचं आयुष्य बदललं आहे.”

याअभिनेत्रीने शेअर केली गुड न्यूज

सोनम कपूर आई झाली ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर दिग्गज अभिनेत्री नीतू सिंगने शेअर केली आहे. अभिनेत्री नीतू सिंगने ही पोस्ट शेअर करत सोनम आणि आनंद यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव : 

सोशल मीडियावर सोनम कपूरच्या प्रेग्नंसीबद्दल अनेच चर्चा रंगत होत्या. सोनमला मुलगा होणार की मुलगी? याबाबत तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. आणि आता अखेर सोनमने ही गुड न्यूज दिली आहे. त्यामुळे तिला सोशल मीडियावर चाहत्यांकडून तसेच जवळच्या मित्र परिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय