solapur latest news

पथदिव्यांची व पाणीपुरवठा योजनांची बीले शासनानेच भरावी अन्यथा तीव्र आंदोलन करू-ग्राम संवाद सरपंच संघाचा इशारा..!solapur latest news

प्रतिनिधी : अजिनाथ कनिचे

ग्राम संवाद सरपंच संघ:-

ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून गावातील पथदिवे यांचे बीले शासन भरत असे परंतु मागील काही वर्षात शासनाने या बिलाची रक्कम संबंधित ग्रामपंचायतीने भरावे, असे आदेश काढले आहेत. वास्तविक ग्रामपंचायत उत्पन्न वाढ व वसुलीसाठी आज पर्यंत कोणत्याही सरकारने ठोस उपाय योजना केले नाहीत. त्यामुळे पथदिव्यांची बिले शासनानेच भरावीत अशी मागणी ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य यांनी केली आहे.

गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे ग्रामपंचायत ची वसुली ठप्प झाली असून, वीज वितरण कंपनीने पथदिव्यांचे व पाणीपुरवठा योजनांच्या थकित बिलापोटी कनेक्शन कट करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात अंधार पसरला आहे तर सर्व सामन्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच ही बिले पंधरावा वित्त आयोगाच्या निधीतून भरण्यासाठी सरपंच व ग्रामपंचायत मध्ये संताप व्यक्त केला जात आहे. 15 वा वित्त आयोगाचा निधी हा केंद्र सरकार पायाभूत सुविधांची निर्मिती व आरोग्य स्वच्छता पाणी आदींसाठी देत त्यावर महाराष्ट्र शासनाने डोळा ठेवणे म्हणजे ग्रामीण भागाच्या विकासाला खीळ बसणार आहे. solapur latest news

कोरोना काळामध्ये गाव सुरक्षित ठेवण्यासाठी सरपंच व उपसरपंच सदस्य यांनी केलेली जीवापाड मेहनत आपल्याला ज्ञात आहेच, अशा परिस्थितीत मदतीचा हात द्यायचे सोडून शासनाने ग्रामपंचायतींना वाऱ्यावर सोडून देत आहेत. हे खूप खेद जनक व गावा वरती अन्यायकारक गोष्ट आहे तसेच पूर्वी प्रमाणे शासनाने लाईट बिल व पाणीपुरवठा बिल भरण्याकरता 15 वित् आयोगातील पैशाला हात न लावता शासनस्तरावरून निधी उपलब्ध करून थकीत बिले भरण्यात यावी अशी जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व उप कार्यकारी अधिकारी श्रीमती चंचल पाटील यांना निवेदन देऊन मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करणार आहे. असा इशारा दिला आहे.

यावेळी ग्राम संवाद सरपंच संघ या सरपंच संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सतिश भुई, पश्चिम महाराष्ट्र संघटक भास्कर भोसले, अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष सुनील राजमाने, उपाध्यक्ष कोमल (ताई) करपे, सभापती सिद्धार्थ आण्णा गायकवाड, रफिक नदाफ, पुष्पावती आवटे तालुकाध्यक्ष संगमेश पाटील, नसीर जाहागीरदार, दीपक चव्हाण, संभाजी मंडलिक , महादेव काकडे, सचिन भिंगारे, संकल्प जाधव व इतर सर्व पदाधिकारी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

 

एका माणसाने १.२ लाखात फक्त १२ आंबे विकत घेतले, त्याचे कारण जाणून घ्या ! viral Mango girl

ताज्या आणि मनोरंजक करमणुकीच्या बातम्यांसाठी : ABC मराठी न्यूजचे  Entertainment Facebook Page  ला लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा !

 

परंपरा विश्वासाची

🌐ABC Marathi न्यूज नेटवर्क📡

⭕👉 संपुर्ण महाराष्ट्रात जिल्हा / तालुका प्रतिंनिधी नेमने चालू आहे. इच्छुकांनी संपर्क करा !

📲7841913458

बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.

संपादक आनंद पाटील

मुख्य संपादक  – ताम्रध्वज मनाळे.

संपर्क–7841913458 / ९८३४८५८०५८

Email- abcmarathinews1@gmail.com

WebSite- www.abcmarathinews.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय