दिल्ली : मित्रानो आजही अनेक स्मार्टफोन युजर्स त्यांच्या सोयीसाठी  दोन सिम कार्ड वापरतात. आधी युजर्स स्वस्त टेलिकॉम सेवांसाठी एकापेक्षा जास्त सिम ठेवायचे त्यावेळी Sim Active ठेवण्यासाठी दरमहा रिचार्ज करण्याची सक्ती नव्हती आणि हेच ड्युअल सिम किंवा सेकंडरी सिम सुरू करण्याचे कारण काय होते. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. अशात येत्या काळात दोन सिमचा वापर बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मर्यादित टेलिकॉम प्लेयर्स आणि त्यांचे रिचार्ज प्लान यामागील कारण असू शकते.Sim Card

दोन सिम कार्ड वापरणे पडणार महागात

टेलिकॉम कंपन्या लवकरच त्यांच्या प्रीपेड रिचार्ज प्लानच्या किमती वाढवू शकतात. अशात सेकंडरी सिम सक्रिय ठेवणे युजर्ससाठी महाग होईल. असे झाले तर हळूहळू सेकंडरी सिमचा ट्रेंडचा पूर्णपणे संपेल. गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लानच्या किमती वाढवल्या होत्या. यावेळीही अशीच अपेक्षा आहे.

विशेष म्हणजे Airtel नेही तसे संकेत दिले आहेत. अलीकडे, एअरटेलने दोन सर्कलमध्ये आपल्या किमान रिचार्ज प्लान महाग केले आहेत. अहवालांनुसार ही वाढ केवळ चाचणी असून येत्या काही दिवसांत ती सर्व सर्कलमध्ये लागू होऊ शकते. गेल्या वर्षी देखील एअरटेलने नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आपले रिचार्ज प्लॅन महाग केले होते. त्यावेळी कंपनीने ७९ रुपयांच्या किमान रिचार्ज प्लॅनची किंमत ९९ रुपयांपर्यंत वाढवली होती.

उत्पन्न वाढवण्यासाठी रिचार्जच्या किंमतीत वाढ

गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षी देखील युजर्सना रिचार्ज प्लानमध्ये २० ते २५ टक्क्यांनी वाढ होण्याची अपेक्षा आहे. रिचार्ज प्लानच्या किंमती वाढवण्याबाबत बऱ्याच दिवसांपासून सांगितले जात आहेत. प्रीपेड रिचार्ज प्लॅनची किंमत वाढवण्याचा अर्थ असा की, कंपनीचा एआरपीयू आणि एकूण महसूल अधिक चांगला होईल. Airtel आणि Vodafone-Idea ने याबाबत अनेकदा चर्चा केली आहे. 5G लाँच केल्यानंतर, टेलिकॉम कंपन्यांकडे रिचार्ज महाग करण्याचे आणखी एक कारण आहे.  Sim Card

दोन सिम कार्ड वापरण्याचा ट्रेंड संपणार ?

टेलिकॉम सेवा स्वस्त असताना त्याचा ट्रेंड सुरू झाला. सर्व टेलिकॉम ऑपरेटर्सच्या सेवेची किंमत जवळपास सारखीच असल्याने आणि आगामी काळात त्यांच्या किमतीत फारसा फरक पडणार नाही. अशात, दोन्ही सिम सक्रिय ठेवण्यासाठी युजर्सना समान रक्कम खर्च करावी लागेल. असे झाल्यास लोक मोठ्या संख्येने सेकंडरी सिमचा वापर बंद करू शकतात.

[Top 16] Business Ideas In Marathi कमी भांडवलामध्ये हे व्यवसाय करा आणि मालामाल व्हा ?

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय