दिनांक १० जून २०२१ रोजी मौजे बेडसिंगे येथील काळे वस्ती या ठिकाणी महाराष्ट्र शासन कृषी विभागा मार्फत क्रॉपसॅप संलग्न महिलांची खरीप मका पिकाची शेतीशाळा घेण्यात आली.
सुधारित कृषी तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी शेती शाळा हे प्रभावी माध्यम असल्याने तसेच शेती व्यवसायामध्ये महिलांचा मोलाचा वाटा असल्याने कृषी विभागाने महिलांच्या शेतीशाळा घेण्यावर विशेष भर दिलेला आहे. तालुका कृषी अधिकारी श्री भाऊसाहेब रुपनवर व मंडळ कृषी अधिकारी श्री गणेश सूर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक १५ मे २०२१ ते ०१ ऑक्टोबर २०२१ दरम्यान सदर शेती शाळा दहा वर्गांमध्ये घेण्यात येणार आहे. सदर शेती शाळेसाठी मका पीक घेणाऱ्या व सुधारित तंत्रज्ञान वापर करण्यास उत्सुक असणाऱ्या महिलांची निवड करण्यात आलेली आहे.
या शेती शाळेमध्ये मका पीक परिसंस्था निरीक्षणे, माती परीक्षण, बीजप्रक्रिया, दशपर्णी अर्क, बीजामृत व जीवामृत प्रात्यक्षिके, मका पिकावरील लष्करी आळी नियंत्रण , कामगंध सापळे प्रात्यक्षिक, एकात्मिक तण व्यवस्थापन, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन व मका काढणीपश्चात तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दिनांक १० जून २०२१ रोजी संपन्न झालेल्या शेतीशाळा वर्गामध्ये मंडळ कृषी अधिकारी श्री सूर्यवंशी यांनी बीज प्रक्रियेचे महत्व व माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन विषयक मार्गदर्शन केले.
जैविक बीजप्रक्रिया केल्याने रासायनिक खतामध्ये बचत होते परिणामी उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होते. त्यामुळे माती परीक्षण करूनच खते द्यावी व बीजप्रक्रिया करूनच पेरणी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
यावेळी शेती शाळेच्या महिलांची श्री.अरुण काळे यांच्या शेतावर प्रक्षेत्र भेट आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी हुमणी भुंगेरे नियंत्रण प्रकाश सापळा कसा बनवावा याचे प्रात्यक्षिक दाखविले.
यावेळी कुमारी अनुपमा देवकर कृषी सहाय्यक यांनी हुमणी भुंगेरे नियंत्रण विषयी मार्गदर्शन केले. सदर शेती शाळेस महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
खलील दृश्यामध्ये आपण पाहत आहात कु. अनुपमा देवकर कृषी सहाय्यक सविस्तर माहिती देताना दिसत आहेत.
यावेळी प्रगतशील महिला अश्विनी काळे ,सुजाता काळे, लता देवकर, मनीषा सूर्यवंशी, मनीषा जाधव ,आशा यादव ,प्रमिला यादव , व इतर महिला उपस्थित होत्या.
उजनी काठाचे सौंदर्य – कोकरे आयलॅन्ड ! Kokare Island Kugaon! सविस्तर वाचा
स्वतःच्या वडीलाच्या राखेचा उपयोग झाडे लावण्यासाठी केला
“परंपरा विश्वासाची”
बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.
संपादक – आनंद पाटील
संपर्क – ९८३४८५८०५८ / ७८४१९१३४५८
Email- abcmarathinews1@gmail.com
WebSite- www.abcmarathinews.com