इंदापूर प्रतिनिधी :- गोविंद पाडुळे 

मा. खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील इंदापूर तालुक्यातील कालठण नं.1 येथे ज्येष्ठ नेते मा. किसानराव जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व सोशल मीडिया प्रमुख मा. श्रीकांत पवार यांचे कडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी येथे लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी लहान मुलांनी पवार साहेब यांना दीर्घायुष्य लाभो म्हणून शुभेच्छा दिल्या.
गेल्या सात ते आठ वर्षांपासून पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त  दरवर्षी न चुकता श्रीकांत पवार  स्वतःच्या कष्टाने कमावलेल्या स्वखर्चातून हा उपक्रम राबवत असतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी सदैव एकनिष्ठ असणारे श्रीकांत पवार हे मा.अजितदादा पवार साहेब यांचे कट्टर समर्थक आहेत.गेल्या वर्षी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांसाठी कालठण येथे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.


मुख्याध्यापक श्री. राजेंद्र जगताप,श्री. प्रशांत घुले, श्री.अमोल बोराटे,  कंदमाला राऊत मॅडम  व शिंदे मॅडम यांचे सहकार्य लाभले.
सदर कार्यक्रमासाठी महाराष्ट्र चॅम्पियन वस्ताद मा. बाबासाहेब कोळेकर(कुस्ती),माजी चेअरमन विजय जेडगे, हनुमंत पांडुळे, संग्राम कदम,हर्षल पाडुळे उपस्थित होते.

जळगावात भाडेकरुच्या बायकोसोबत घरमालकाचे अनैतिक संबंध अन् शेवटी आयुष्यचं उद्वस्त झालं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय