School Holiday

School Holiday : वाढत्या तापमानामुळे राज्यातील सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये उद्यापासून म्हणजेच २१ एप्रिलपासून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसा शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जारी केला आहे. 

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

राज्यातील इतर मंडळांच्या शाळा विहित वेळापत्रकानुसार सुरू असतील किंवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबवले जात असतील, तर शाळा प्रशासनाने आपल्या स्तरावर विद्यार्थ्यांसाठी सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घ्यावा, असे आदेश देण्यात आले आहेत.

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शैक्षणिक वर्ष पूर्ण झालेल्या शाळांचा अहवाल मागवला होता. त्यानुसार वाढत्या उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मे महिन्याची सुटी एप्रिलमध्येच देण्याचा निर्णय घेतला आहे.

दहावी बारावी बोर्ड निकाल या तारखेला लागणार तारीख पहा

वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर मुलांनी काळजी घेण्याचे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे. राज्यातील ज्या शाळांमध्ये परीक्षा संपल्या आहेत, त्या शाळांना सुट्टी असणार आहे. राज्यातील शाळांना 21 एप्रिलपासून सुट्या सुरू होणार असून 15 जूनपर्यंत सुरू राहणार आहेत.विदर्भातील कडाक्याच्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विदर्भातील शाळा 30 जूनपर्यंत बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे.

राज्यातील वाढत्या तापमानामुळे पालक चिंतेत होते. सीबीएसई व इतर केंद्रीय बोर्डाच्या शाळा सकाळच्या सत्रात घेण्याची मागणी शाळा प्रशासन आणि शालेय शिक्षणमंत्र्यांकडे करण्यात आली. खारघरच्या उष्माघाताने झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर, नवी मुंबई पालक संघासह राज्यातील इतर पालक संघटनांनी सीबीएसई आणि इतर केंद्रीय बोर्डाच्या शाळा सकाळच्या सत्रासोबतच सुरू ठेवाव्यात, अशी मागणी केली होती. School Holiday

 आमच्या व्हाट्सऍप ग्रुप मध्ये जॉईन व्हा

 

राज्यात १५ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत

राज्यात यंदा १५ जूनपासून शाळा सुरू होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. 

प्रचंड उष्णतेमुळे विदर्भात ३० जूनपासून शाळा सुरू होतील, असे दीपक केसरकर यांनी सांगितले. 

मुलांना सुट्टीचे योग्य नियोजन करता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

दीपक केसरकर म्हणाले, केंद्राचा नवभारत साक्षरता कार्यक्रम होणार आहे. 

यापुढे शासकीय व स्थानिक शासकीय शाळांमध्ये शालेय कपडे, पुस्तके, शूज व मोजे शासनाकडून मोफत दिले जाणार आहेत. 

तसेच प्रत्येक पाठानंतर एक पान रिकामे ठेवले जाईल.

हे पण वाचा …

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय