इंदापूर प्रतिनिधी – डॉ. संदेश शहा :- स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी मित्र मंडळाला २५ वर्षे पूर्ण झाल्याने त्यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ज्येष्ठ पत्रकार अरुण कुमार मुंदडा यांना स्वातंत्र्यवीर सावरकर कार्य गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. निर्भिड, सत्य व सडेतोड पत्रकारिता करत असल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना मान्यवराच्या हस्ते पुष्पगुच्छ,मानचिन्ह, शाल व स्वा. सावरकरांचे माझी जन्मठेप हे पुस्तक देऊन त्यांना गौरविण्यात आले .

अरुणकुमार मुंदडा हे अभ्यासू, व्यासंगी व सत्य वादी पत्रकार असून ते अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. या पुरस्काराबद्दल अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम. डी. शेख, जिल्हाध्यक्ष डॉ. संदेश शहा, जिल्हा निरीक्षक शौकत तांबोळी, जिल्हा सरचिटणीस काकासाहेब मांढरे, इंदापूर तालुकाध्यक्ष राजेंद्र कवडे देशमुख, शहराध्यक्ष सुरेश जकाते, सचिव धनंजय कळमकर, मार्गदर्शक विलास गाढवे, कैलास पवार, निवृत्ती भोंग, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संचलित बारामती तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर तावरे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

त्यांनी मागील ४२ वर्षा पासून महाराष्ट्रातील, देशातील विविध प्रसिद्ध वर्तमान पत्रामध्ये वार्ताहर,पत्रकार, फ्री लांस रिपोर्टर,संपादक निवासी संपादक, मुख्य संपादक अशा विविध मोठ्या पदावर काम करून गरीब, दलित, पीडित,शोषित, शेतकरी, मजूर,कामगार,नोकरदार या सर्वांच्या व्यथा लिखाणाच्या माध्यमातून मांडून अन्यायाच्या विरोधात आवाज उठवत त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे आणि सध्या देखील करत आहेत.

अरुणकुमार यांनी आपल्या परखड लिखाणाच्या माध्यमातून वर्तमान पत्रांमध्ये शासन,प्रशासना तसेच पुढार्‍यांच्या विरोधात रोखठोक लिखाण करून त्यांच्या चुका दाखवण्याचे काम केले. सामाजिक,आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच राजकीय अशा सर्वच बाबीवर त्यांनी पुराव्यानिशी सडेतोड लिखाण करून समाज बलवान करण्याचे काम करत आहेत. त्यामुळे समाजातील आदर्श, निष्कलंक, स्वच्छ प्रतिमेचा लढवय्या पत्रकार म्हणून महाराष्ट्र तसेच देशभर त्यांची ओळख निर्माण झाली. पत्रकारिता करत असताना त्यांनी निष्पक्ष, निस्वार्थी, प्रामाणिक, वास्तववादी, रोखठोक लिखाणाच्या माध्यमातून समाज प्रबोधन, लोक जनजागृती तसेच लोकां पर्यंत ज्ञान माहिती पोहोचवण्यासाठी जनहिताचे अनमोल काम केले आहे. त्यांच्या या लक्षवेधी समाज कार्याची दखल घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी मित्र मंडळाने त्यांचा मानसन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. गेल्या बेचाळीस वर्षापासून पत्रकारिता करत असताना त्यांनी वास्तव वादी, सत्यवादी लिखाण केल्यामुळे भ्रष्टाचाराची प्रकरणे मोठ्या प्रमाणात उघड झाली त्यामुळे त्यांना विविध स्तरातून लोकांच्या धमक्या आल्या, त्यांना आर्थिक अमिष दाखविण्यात आले,कोणत्या न कोणत्या कारणाने त्यांना अडचणीत आणण्याचे काम झाले, त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप देखील झाले मात्र अरुणकुमार मुंदडा कोणत्याही अमिषाला,दबावाला बळी पडले नाहीत. त्यांनी कोणालाच भीक घातली नाही.

त्यामुळे इतकी वर्ष पत्रकारिता करूनही त्यांच्याकडे कोणी बोट दाखवू शकले नाहीत. त्यांची प्रतिमा स्वच्छ,निर्मळ राहिली, नाव खराब झाले नाही. त्यांनी सडेतोडपणे लिखाण करून निर्भीड पत्रकारिता केली. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे काम त्यांनी केल्याने विविध क्षेत्रातील विविध पुरस्कार मोठ्या प्रमाणात त्यांना मिळाले आहेत तसेच महाराष्ट्र शासनाने देखील त्यांच्या कार्याची दखल घेवून त्यांना पुरस्कार देवून त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. अरुणकुमार मुंदडा यांनी इतर वर्तमानपत्रात काम करत असताना त्यांनी समाजहितासाठी, लोकहितासाठी, अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, समाजाच्या व्यथा मांडण्यासाठी, त्यावर सडेतोड लिखाण करण्यासाठी स्वतःचे विक्रांद टाइम्स व अग्रसेन टाइम्स असे दोन साप्ताहिक गेल्या नऊ वर्षांपूर्वी नित्य नियमाने काढत आहेत.त्या माध्यमातून आपल्याला महत्त्वाच्या विषयावरती लिखाण करून समाजाला जागृत करण्याचे, योग्य दिशा देण्याचे महत्त्वाचे काम करत आहेत.त्यामुळे अरुणकुमार मुंदडा यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय