गेल्या अनेक वर्षांपासून सरपंच आणि उपसरपंच यांच्या पगारात वाढ करण्याचा सरकारचा विचार होता, त्यानुसार 2019 च्या अर्थसंकल्पात सरकारने सरपंच आणि उपसरपंच यांच्या वेतनात किंवा मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्याचे मानधन पुढीलप्रमाणे असेल. खालील वेतन किंवा मानधनाच्या 75% रक्कम शासनामार्फत दिली जाईल आणि उर्वरित 25% ग्रामपंचायत स्वनिधीतून अदा करेल.
सरपंच – उपसरपंच यांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा शासन निर्णय
येथे क्लिक करून पहा
0 ते 2000 लोकसंख्या असलेल्या गावच्या सरपंचांना 3000 रुपये आणि उपसरपंचांना 1000 रुपये. 2001 पासून 8000 लोकसंख्या असलेल्या सरपंचांना 4000 रुपये. उपसरपंचसाठी 1500 रुपये असतील. तसेच 8001 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांच्या सरपंचांना 5000 रुपये आणि उपसरपंचांना 2000 रुपये दिले जातील.