सोलापुर :- कोल्हापूरहून पंढरपूरकडे कार्तिक वारीसाठी निघालेल्या दिंडीत कार घुसून 7 वारकऱ्यांचा मृत्यू झाला. ही घटना सांगोला – मिरज मार्गावरील जुनोनी गावाजवळ घडली. अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
मृतांत यांचा समावेश
शारदा आनंद घोडके, सुशीला पवार, गौरव पवार, रंजना जाधव, सर्जेराव जाधव, सुनीता काटे, शांताबाई जाधव अशी मृतांची नावे आहेत. पाच जण जखमी आहेत त्यामध्ये अनिता गोपीनाथ जगदाळे, अनिता सरदार जाधव, सरिता अरुण सियेकर, शानू ताई विलास सिंयेकर, सुभाष केशव काटे हे पण जठारवाडी येथील रहिवासी असून त्यांच्यावर काळाचा गाला मृत वारकरी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील जठारवाडी गावाचे रहिवासी आहेत.
असा घडला अपघात
(एम. एस. 13 डी.ई. 7938) ही कार भरधाव वेगात दिंडीत घुसली. या दिंडीचा विसावा जुनोनी जवळील श्रीरामवाडी येथे होता. आणखी दोन किलोमीटर अंतरावर विसावा असतानाच त्या अगोदरच हा अपघात झाला आहे. सांगोला तालुक्यातील सोनंद गावातील एका व्यक्तीची कार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. सांगोला पोलीस घटनास्थळी पोहोचले असून जखमींना सांगोला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
टेम्पोची जोरात धडक
सांगोला-मिरज मार्गावर जुनोनी गावाजवळ हा अपघात झाला आहे. पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना टेम्पोची जोराची धडक बसली आहे. वाहनांच्या धडकेत सहा वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. हे वारकरी कोल्हापूर जिल्ह्यातील जठार वाडीचे असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र, मृतांची नावे समजू शकली नाही.

कार्तिक वारीसाठी पंढरपूरला जात होते
वारकरी हे कार्तिक वारीसाठी पंढरपूरला निघाले होते. त्यांची दिंडी रस्त्याच्या एका कडेने भजन, टाळ-वाद्यांच्या निनादात पुढे मार्गक्रमण करीत होती. या दरम्यान रस्त्याने जाणारा एका टेम्पो थेट दिंडीत घुसला. या टेम्पोने अनेक वारकऱ्यांना चिरडले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
मृत वारकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख
कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांना सांगोला मिरज मार्गावर वाहनाने चिरडल्यामुळे झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये तातडीच्या मदतीची देखील त्यांनी घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी हे वृत्त कळताच तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला तसेच या घटनेतील जखमी वारकऱ्यांना ताबडतोब योग्य ते उपचार देण्यात यावे असे निर्देश दिले. हा अपघात कसा झाला याविषयी तातडीने चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
संतापजनक! पत्नी गळफास घेत असताना पतीचं धक्कादायक कृत्य, वाचून बसणार नाही विश्वास pati patni news
Viral Video : सकाळपर्यंत चालले लग्न, लग्नमंडपातच वधू चक्क गाढ झोपली, व्हिडीओ झाला व्हायरल
https://abcmarathinews.com/viral-dance-video/