rashtrvadi shivsena news

महाविकासआघाडीमध्ये पुन्हा एकदा धुसफूस सुरू झाल्याचं बोललं जात आहे, यावेळी विधानपरिषद निवडणुका या धुसफुशीचं कारण असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भातून नागपूर आणि अमरावती या दोन मतदारसंघाची विधानपरिषदेसाठी मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणूक लढणार असल्याचं जयंत पाटील म्हणाले.

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस दोन जागा मागत आहे. राष्ट्रवादीच्या या मागणीमुळे काल महाविकासआघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीला काँग्रेस नेते आले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून महाविकासआघाडीमध्ये पुन्हा एकदा बिघाडी झाल्याचं चित्र आहे.

महाविकासआघाडीच्या समन्वय समितीची बैठक काल म्हणजेच मंगळवारी 1 नोव्हेंबरला अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर होणार होती, पण काँग्रेस नेते आणि उद्धव ठाकरे नसल्यामुळे ही बैठक रद्द करण्यात आली होती. काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचं नियोजन करत असल्यामुळे बैठकीला येऊ शकणार नाहीत, असं काँग्रेसकडून सांगण्यात आलं होतं. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधरच्या सहा जागांसाठी महाविकासआघाडीचे नेते चर्चा करणार होते, पण आता ही बैठक कधी होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

दरम्यान राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये महाविकासआघाडीचे नेते सहभागी होणार आहेत. काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधींच्या या यात्रेत सहभागी होण्याचं आमंत्रण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना दिलं होतं. या यात्रेचं निमंत्रण दोन्ही पक्षांनी स्वीकारलं होतं, त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे या भारत जोडो यात्रेत राहुल गांधींसोबत सहभागी होणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे.

 

केरळ, तामीळनाडू, कर्नाटक आणि तेलंगणानंतर राहुल गांधींची भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात दाखल होणार आहे. नांदेडच्या देगलुरमध्ये भारत जोडोचं आगमन होणार आहे, पण या यात्रेत केवळ 5 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा नांदेड, वाशिम, अकोला, बुलढाणा आणि जळगाव या जिल्ह्यांमधून जाणार आहे.

संतापजनक! पत्नी गळफास घेत असताना पतीचं धक्कादायक कृत्य, वाचून बसणार नाही विश्वास pati patni news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय