एखाद्या प्राण्याची शिकार करतानाही तुम्ही अजगराला पाहिलं असेल. अजगराचे बरेच व्हिडीओ आज काल सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तुम्ही कधी माणसाची शिकार करताना अजगराला पाहिलं आहे का ? नाही ना मग आज तुम्ही पाहून घ्या त्या अगोदर काय झालं ते समजून घ्या.

तुम्हाला अजगराची शिकार करण्याची पद्धत तर माहिती असेलच. शिकाऱ्याभोवती वेटोळे घालून त्याला अख्ख्याच्या अख्खं जिवंत गिळतो. प्राण्यांची शिकार करताना अजगराला पाहूनच आपल्याला धडकी भरते. या प्राण्यांच्या जागी माणूस… विचारही नकोसा वाटतो. पण असाच व्हिडीओ चर्चेत आला आहे.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक महिला एका लहान बाळाला घेऊन दिसते आहे. एक व्यक्ती एका मोठ्या बॉक्सजवळ आहे. महिला मुलाला घेऊन त्या बॉक्सजवळ जाते. तितक्यात त्या बॉक्समधून भलामोठा अजगर बाहेर येतो आणि बॉक्सजवळ बसलेल्या व्यक्तीवर हल्ला करतो. अजगर त्या व्यक्तीचा चेहराच आपल्या जबड्यात धरतो.

हे पण वाचा -Hippo trending News ने 2 वर्षांच्या मुलाला गिळलं, पण नंतर असं काही घडल की पुन्हा बाहेर फेकलं!

महिला घाबरते आणि मोठमोठ्याने ओरडून सर्वांना मदतीसाठी बोलावते. काही लोक तिथं धावत येतात. व्यक्ती आपल्या दोन्ही हातांनी त्या अजगराला पकडून ठेवते. इतर लोकही त्या व्यक्तीच्या अजगराच्या तावडीतून सुटका करण्यासाठी सर्वजण धडपड करतात. पण अजगराने त्या व्यक्तीचं तोंड आपल्या जबड्यात इतकं घट्ट पकडलं आहे की इतके लोक खेचूनही निघत नाही आहे. एक व्यक्ती तर अजगराच्या शेपटीवर वारही करते. पण काहीच फरक पडत नाही.

व्हिडीओच्या शेवटपर्यंत या व्यक्तीचं तोंड अजगराच्या जबड्यातून बाहेर पडल्याचं दिसत नाही. त्यामुळे त्याचं शेवटी काय झालं याची माहिती नाही. हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. @laris_a9393 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून सर्वांनाच धडकी भरली आहे. त्यावर बऱ्याच शॉकिंग कमेंट येत आहेत.

https://www.instagram.com/reel/CmHsfLPOuNn/?utm_source=ig_web_copy_link

4-Legged Baby Girl Born अजबच! महिलेने दिला चार पाय असलेल्या मुलीला जन्म, लोक म्हणाले हा तर दैवी चमत्कार…

तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटलं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.

थंडीच्या दिवसात गूळ खाणे ठरेल आरोग्यासाठी वरदान ! जाणून घ्या फायदे HEALTHY FOOD

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय