सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ बेंगळुरूमधील अमृता हल्लीचा आहे, ज्यामध्ये एका महिलेला पुजारी मंदिरातून बाहेर ओढताना दिसत आहे. इतकंच नाही तर पुजारी महिलेला मारहाणही करत आहे. ही घटना 21 डिसेंबरची असली तरी ती आता समोर आली आहे. या महिलेला अशाप्रकारे मंदिरातून बाहेर काढण्यात आलं कारण ती भगवान व्यंकटेश्वराची पत्नी असल्याचा दावा करत होती आणि तिला त्यांच्या मूर्तीजवळ बसायचं होतं.

ही संपूर्ण घटना लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरातील आहे. हा व्हायरल व्हिडीओ ४४ सेकंदांचा आहे, ज्यामध्ये ती महिला मूर्तीजवळ बसण्याचा हट्ट करताना दिसते. तर मंदिराचा पुजारी तिचे केस पकडून, लाथ मारून, धक्काबुक्की करत तिला मंदिराबाहेर ओढत असल्याचं पाहायला मिळतं. महिलेनं मंदिरात जाण्यासाठी पुन्हा-पुन्हा उठण्याचा प्रयत्न केला असता पुजार्‍याने तिला चापट मारून खाली पाडलं, त्यानंतर एक व्यक्ती काठी घेऊन आला, त्यानंतर ही महिला पळून गेली.

मंदिरात उपस्थित पुजार्‍यांचा दावा आहे की, जेव्हा त्यांनी तिला मूर्तीजवळ बसू दिलं नाही तेव्हा तेव्हा ती महिला त्यांच्यावर थुंकली. महिलेनं मूर्तीशेजारी बसण्याचा आग्रह धरल्याने तिला हाकलून देण्यात आलं. मात्र पुजारी ज्या पद्धतीने तिला बाहेर ओढत आहेत, त्यावरून सोशल मीडियावर टीका होत आहे.

Ramdev Baba “महिला कपडे घातल्या नाहीत तरी चांगल्या दिसतात”; रामदेव बाबांचे वादग्रस्त वक्तव्य

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपी व्यक्ती मंदिर प्रशासनाचा बोर्ड मेंबर असून 21 डिसेंबर रोजी ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे.

ही घटना घडली त्यावेळी पुजाऱ्यासोबतच आणखी तीन लोक, ज्यापैकी दोन जण पुजार्‍यासारखे कपडे घातलेले आहेत, गर्भगृहात उपस्थित होते. परंतु त्यापैकी कोणीही पुजाऱ्याला रोखण्याचा किंवा महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. पोलिसांनी पुजाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पुजारी मुनीकृष्णाविरुद्ध भादंवि कलम ३५४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया यूजर्स संतापले आहेत. कुणी म्हणतंय की, 2023 मध्ये अशी घटना घडत असेल तर ती शरमेची बाब आहे, तर कुणी म्हणतंय की हा अफगाणिस्तान नाही. त्याचप्रमाणे काही युझर्स आरोपी तुरुंगातच असावेत, असे सांगत आहेत.

news source – https://lokmat.news18.com/viral/temple-staff-member-thrashing-a-woman-and-then-dragging-her-out-of-temple-video-mhkp-810727.html https://www.tv9marathi.com/trending/bengaluru-video-viral-dalit-woman-assaulted-for-entering-in-temple-crime-news-au177-851151.html

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय