Priyanka Chopra Latest News _अभिनेत्री प्रियंका चोपडाने आज सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण आई झाल्याचे जाहीर केले आहे.

त्यामुळे प्रियंकाचा चाहत्यावर्ग खूप आनंदात आहे. प्रियंका चोपडाने 2018 साली अमेरिकन सिंगर निक जोनस याबरोबर लग्नगाठ बांधली होती.

तेव्हापासूनच प्रियंका गुड न्यूज कधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु आज प्रियंका आणि निक यांनी सर्वांच्या प्रतिक्षाला पूर्णविराम देत ट्विटर वर एकसारखी पोस्ट शेअर करत आपण सरोगसी द्वारे आई-बाबा झाल्याचे जाहीर केले आहे .

या बातमीनंतर सर्वांनीच प्रियंकाचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली आहे.

प्रियंकाने आपल्या ट्विटमध्ये ,आम्हाला हे सांगताना खूप आनंद होत आहे कि आम्ही सरोगसीद्वारे बाळाचे स्वागत केले आहे.सध्या आम्ही आमच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करत असल्यामुळे सर्वांनी आमच्या गोपनीयतेचा आदर करावा अशी विनंती करते असे म्हटले आहे.

या अगोदर देखील बॉलिवूडमधील अनेक कलाकार सेरोगेसी तंत्रज्ञानाचा वापर करून आई-बाबा झालेले आहेत. यामध्ये करण जोहर, आमिर खा,शाहरुख खान, एकता कपूर, तुषार कपूर ,प्रीती झिंटा यांचा समावेश होतो.

यामध्ये आता आणखी एक नाव जोडले गेलेले आहे.

प्रियांका चोपडाला मुलगी झाली असून ती प्रीमॅच्युअर आहे. बाळाचा जन्म अपेक्षित तारखे पेक्षा सुमारे 12 आठवडे अगोदर झाल्याने बाळाची तब्येत नाजूक असून ते हॉस्पिटलमध्ये आहे.

मुलगी जोपर्यंत पूर्ण सशक्त होत नाही तोपर्यंत ती हॉस्पिटलमध्येच राहणार असल्याचा निर्णय प्रियंका आणि निक यांनी घेतला असल्याचे समजते.प्रियंका चोपडा ही भारतातील एक आघाडीची अभिनेत्री असून तिचा जन्म 18 जुलै 1982 साली जमशेदपूर येथे झाला आहे.

प्रियंकाने 2000 साली मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावावर केला होता.

प्रियंकाने 2018साली आपल्यापेक्षा सुमारे दहा वर्षांनी लहान असलेल्या अमेरिकन सिंगर निक जोनस याबरोबर भारतातच अतिशय थाटामाटात लग्न केले होते.

त्यानंतर मध्यंतरी प्रियांका निक जोनस बरोबर घटस्पोट घेणार असल्याच्या बातम्या येत होत्या परंतु प्रियंकाने आपण आई झाल्याची बातमी शेअर करून या अफवावर पूर्णविराम दिला आहे.

परंपरा विश्वासाची

बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.

संपादक आनंद पाटील
मुख्य संपादक  – ताम्रध्वज मनाळे.

संपर्क–7841913458 / ९८३४८५८०५८

Email- abcmarathinews1@gmail.com

WebSite- www.abcmarathinews.com

 🌐ABC Marathi न्यूज नेटवर्क📡

⭕👉 संपुर्ण महाराष्ट्रात जिल्हा / तालुका प्रतिंनिधी नेमने चालू आहे. इच्छुकांनी संपर्क करा !

या साईट ला सब्सस्क्राईब करा !

फेसबूक पेज ला आत्ताच Follow करण्यासाठी क्लिक करा

 

death old man suddenly breathed even opened his eyes अंत्यसंस्कारासाठी लोक निघाले, वृद्धाने अचानक श्वास घेतला, डोळेही उघडले!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय