राजमुद्रा प्रतिष्ठान व समस्त ग्रामस्थ पिंपरी बुद्रुक आयोजित शिवजयंती साजरी करण्यात आली डीजे ला छाटा देऊन मुला, मुलींच्या डान्स ला प्रोत्साहन मिळावे म्हणुन शालेय शिव-सांस्कृतिक महोत्सव 2023 साजरा करण्यात आली.
सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थीत सर्व मान्यवरांच्या हस्ते करून नंतर महाराजांच्या प्रतिमेच्या पालखी ची मिरवणुक काढण्यात आली.
नंतर 11 वाजता शरद बोडके व राजमुद्रा प्रतिष्ठान च्या वतीने स्नेहभोजना चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला नंतर सायंकाळी 6 वाजता शालेय शिव-सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले. दिनांक. 20 फेब्रुवारी ला सुद्धा शालेय शिव सांस्कृतिक महोत्सव आयोजीत करण्यात आले होते.
यापुढे असाच पारंपरिक पद्धतीने शिवजयंतीचा कार्यक्रम पुढील काळामध्ये राजमुद्रा प्रतिष्ठान च्या वतीने तरुण वर्गाने व गावकऱ्यांनी करण्याचे ठरवले आहे.