Phone pay scame

Phone pay scame : अलीकडच्या काळात इंटरनेटवर पैशांच्या फसवणुकीचे प्रकार खूप वाढले आहेत. शहरी भागात सायबर गुन्हे सर्रास घडत असतानाच आता ग्रामीण भागही त्याला बळी पडत आहेत. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मोबाईल हॅक करून 3 लाख 70 हजार रुपये लुटल्याची घटना घडली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Phone pay scame

मोबाईल हॅक

मल्हारपेठ परिसरातील (ता. पाटण) येथील एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने तिचा मोबाईल हॅक करून तिच्या बँक खात्यातून गुगल पे व फोन पेद्वारे ३ लाख ७० हजार रुपये काढल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी संबंधित तरुणीच्या तक्रारीवरून मल्हारपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्हारपेठ विभागातील एका गावात राहणारी तरुणी महाविद्यालयात शिकत आहे. त्यांचे स्टेट बँक पाटण शाखेत बचत खाते आहे. त्यात पोस्ट पेमेंट बँक खाते देखील आहे. त्यांनी दोन्ही खात्यात रक्कम जमा केली होती. यासोबतच तिने मोबाईलमधील दोन सिमकार्ड क्रमांकावर गुगल आणि फोन पे सुरू केले आणि त्याद्वारे ती गरजेनुसार ऑनलाइन व्यवहार करत असे.

 आमच्या व्हाट्सऍप ग्रुप मध्ये जॉईन व्हा

दरम्यान, 27 मार्च ते 14 एप्रिल दरम्यान अज्ञात व्यक्तीने तरुणीचा मोबाईल फोन ‘ऍक्सेस’ केला. मुलीचा मोबाईल फोन दुसऱ्या यंत्राद्वारे ताब्यात घेऊन आरोपींनी स्टेट बँकेच्या खात्यातून 2 लाख 80 हजार रुपये आणि पोस्ट पेमेंट बँक खात्यातून 90 हजार रुपये असा एकूण 3 लाख 70 हजार रुपये काढून घेतले.

‘फोन पे’ आणि ‘गुगल पे’च्या माध्यमातून विभागातील मोबाईल वापरून केलेला हा पहिलाच गुन्हा आहे, अशा स्थितीत पोलिसही संभ्रमात पडले आहेत. मल्हारपेठ पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक विकास पाडळे तपास करत आहेत.

 

पोस्ट ऑफिस ‘या’ लोकांना देत आहे 16 लाख 28 हजार रुपये ; जाणून घ्या नेमकं कारण

 

हे पण वाचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय