Papaya Khanyache Nuksan

Papaya Khanyache Nuksan : मित्रांनो सध्या च्या काळात लोक आपल्या आहाराविषयी खूप जागरूक झाले आहेत. आहार व्यवस्थित असेल तर आपणास आजार पणाला सामोरे जावे लागणार नाही. त्यामुळे आहारात मोठ्या प्रमाणात फळांचा वापर वाढला आहे. 

परंतु काही फळांचे जास्त प्रमाणात सेवन केले तर आपल्या शरीराला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. आहारात फळांचा समावेश करताना पहिल्यांदा पपईचा विचार केला जातो. हे फळ जेवढे शरीरासाठी फायदेशीर आहे तेवढेच त्याचे हानिकारक आहे. 

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मित्रांनो आज आपण पपई फळ आणि त्याचे फायदे नुकसान पाहणार आहोत. तुम्हाला या महितीचा नक्की फायदा होणार आहे. हे फळ पोटासाठी खूप फायदेशीर आहे. ज्या लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनी याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. 

पपई खाल्ल्याने खूप  फायदा होतो. पण काही लोकांना चुकीच्या आहारामुळे नुकसानही सहन करावे लागू शकते. चला जाणून घेऊया कच्ची किंवा पिकलेली पपई खाल्ल्याने कोणते दुष्परिणाम होतात?

भारतात येणार कॅन्सरसारख्या आजाराची त्सुनामी, कारण… धक्कादायक अहवाल

पपईमुळे होतो असाध्य आजार

NCBI (Ref) वर प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, पपईच्या झाडामध्ये ऍलर्जीक परागकण असतात.अनेक वेळा हे परागकण पपईसोबत येतात आणि त्यामुळे दम्यासारखे असाध्य रोग होऊ शकतात. 

हा धोका ऍलर्जीने ग्रस्त असलेल्या लोकांना जास्त प्रमाणात होतो. या आजारात श्वास घेताना शिट्टीचा आवाज येणे,  श्वासोच्छवासाचा त्रास, छातीत जड येणे इत्यादी त्रास जाणवतात.

किडनी स्टोन होण्याची समस्या

​ पपईमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. अनेक संशोधने असे सुचवतात की पपई फळाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने ज्यांना आधीच किडनी स्टोन आहे त्यांची समस्या वाढू शकते. अशा लोकांनी पपईचे सेवन कमी करावे.

​पोट होऊ शकते खराब

पपई जितकी पोटासाठी चांगली असते तितकीच हानिकारक असते. कारण त्यात मुबलक प्रमाणात फायबर असते. त्याचे प्रमाण शरीरात जास्त झाल्यास पचनसंस्था  बिघडू शकते. त्यामुळे अपचन, पोट फुगणे, गॅस सारख्या समस्या होऊ शकतात.

गर्भवती महिलांसाठी अतिशय धोकादायक

गर्भवती महिलांनी कच्ची पपई खाणे हे त्यांच्यासाठी अतिशय धोकादायक असते . पपई मध्ये  पॅपेन आणि लेटेक्स असतात, ज्यामुळे गर्भपात होऊ शकतो.

त्यामुळे पपई खाताना काळजी घ्यावी. पपईमध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता असते जेणेकरून पपईचे सेवन प्रमाणात करावे.

हे पण वाचा : मजबूत-स्वच्छ फुफ्फुसासाठी खा हा 1 पदार्थ, फुफ्फुसांना चिकटलेली घाण व विषारी कण होतील नष्ट

Papaya Khanyache Nuksan

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

⇒  UPI Payment new rules वर द्यावा लागणार १.१ टक्का चार्ज, चुकूनही या पद्धतीने करू नका पेमेंट

⇒  positive thoughts in marathi : जीवनात आनंदी राहण्यासाठी रोज हे पाच काम करा.

⇒  बुलडाण्यात विषारी सापाच्या पोटातून निघालं असं काही की बघण्यासाठी उसळली गर्दी, VIDEO पाहून व्हाल शॉक

⇒  कमी भांडवलामध्ये हे व्यवसाय करा आणि मालामाल व्हा ?

⇒  कमी भांडवलामध्ये हे व्यवसाय करा आणि मालामाल व्हा ?

⇒  आईच्या मर्जीविरोधात मुलीने केला विवाह, मग सगळं कुटुंबच

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय