कॉलेजमध्ये कोणी तुम्हाला प्रपोज केलंय का?
झी मराठी वाहिनीवर ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. अभिनेता सुबोध भावे सध्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. या कार्यक्रमात आतापर्यंत सुप्रिया सुळे, अमृता खानविलकर, अमृता फडणवीस, मेधा मांजरेकर या सारख्या प्रतिष्ठीत महिला सहभागी झाल्या आहेत. आता या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात भाजप नेत्या पंकजा मुंडे या देखील हजेरी लावणार आहे. टीव्हीवर या कार्यक्रमाचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यावेळी पंकजाताईना विविध राजकीय घटना, पक्ष आणि इतर खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले.त्यावेळी पंकजाताईनी अनेक प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिली. यावेळी सुबोध भावे यांनी पंकजा मुंडे यांना तुम्हाला कोणी प्रपोज केलंय का?असा प्रश्न विचारला. यावर त्यांनी अतिशय मज्जेशीर उत्तर दिलं आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या की, मला कुणी प्रपोज नाही केलं. तो सुखद अनुभव मला कधीच मिळाला नाही”. कॉलेजमध्ये शिकत असताना माझे वडील गोपीनाथ मुंडे हे गृहमंत्री होते. त्यामुळे मला भरपूर सिक्युरिटी असायची. म्हणून माझ्याशी कोणीही बोलायला घाबरायचे. पण एकदा मैत्री झाली की झाली, मग ती कायम टिकली,” असं त्यांनी नमूद केलं.
दुसऱ्या पक्षतील आमदार कधी फोडलेत का?
सुबोध भावे यांनी पंकजा मुंडे यांना तुम्ही कधी इतर पक्षाचे आमदार फोडले का ?असा प्रश्न केला तेव्हा पंकजा मुंडे यांनी सुबोध भावे यांना अतिशय फिल्मी अंदाजात “एक आमदार की किंमत तुम क्या जानो सुबोध बाबू असे म्हणत यांनी या प्रश्नाचे भन्नाट उत्तर दिले. होय मी दुसऱ्या पक्षतील आमदारांना फोडलंय. माझे बाबा गोपीनाथ मुंडेसाहेब यांनी मला सांगितलंय की कायम बेरजेचं राजकारण करायचं वजाबाकीचं नाही. त्यामुळे इतर पक्षात चांगलं काम करणाऱ्या लोकांना मी फोडलंय.
राजकारणात आणि युद्धात जिंकणं चांगलं असत. अशा परिस्थिमध्ये आपल्या शोभेल असे लोक घेण्याचा मी प्रयत्न करते. बीड जिल्ह्यात झालेलं पक्षांतर त्याचंच द्योतक आहे. नमिता मुंदडा यांना मी आमदार केलं आहे. शिवाय सुरेश धसही भाजपात आले. त्यामुळे पक्षाच्या वाढीसाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी मी इतर पक्षांतील चांगलं काम करणाऱ्या लोकांना मी फोडलंय,” असं पंकजा मुंडे यांनी स्पष्टपणे सांगितलं.