आज दिनांक 14/01/2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांजरवाडी ता येवला येथे बालआनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यात विद्यार्थ्यांनी भाजीपाला बाजार व विविध प्रकारचे खाऊचे स्टॉल लावलेली होती. बाजाराचे उदघाटन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व उपाध्यक्ष श्री संतोष देवरे आणि एकनाथ देवरे व समस्त ग्रामस्थ यांचे हस्ते फित कापून झाले.

बाजारात सहभागी होण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे व्यवहार कौशल्य पाहण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.असा बालमेळावा दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी भरवावा असे वि.वि.का.सोसायटी मा.चेअरमन आसाराम कारभारी देवरे व समस्त ग्रामस्त तरूण युवकांनी सूचित केले. आणि या मुळे मुलांना व्यवहारीक ज्ञान व चलन ओळख व व्यवसायीक ज्ञान प्राप्त होईल आसे प्रत्येक पालक व ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

भाजीबाजारास विशेष उपस्थिती सायगाव केंद्राचे केंद्र प्रमुख श्री शेळके साहेब व त्यांच्यासोबत श्री अमित कलगुंडे सर यांनीही खरेदी करून आणि विद्यार्थ्यांशी व्यवहार ज्ञान विचार गप्पा मारल्या.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री रावसाहेब वैद्य(सर),पदवीधर शिक्षक श्री बाळू आहेर(सर) आणि उपशिक्षक सौ.सविता गुंजाळ (मॅडम),ज्योती जाधव(मॅडम),प्रतिभा मोरे(मॅडम),सपना खोसे(खोजे) यांनी विशेष परिश्रम घेतले.व ग्रामस्थांनी या सर्व शिक्षक व शिक्षीका वृदांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय