राज्य शासन सेवेत 2005 नंतर रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना मार्फत दि.21 सप्टेंबर रोजी पेन्शन संदेश बाईक रॅली आयोजित करण्यात आली आहे .या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री मा.देवेंद्रजी फडणीस यांना संटनेमार्फत पत्र दि.15.09.2022 रोजी सादर करण्यात आले आहे .या संदर्भातील सविस्तर पत्र पुढीलप्रमाणे पाहुयात .
सदर पत्रान्वये सादर करण्यात आले आहे कि ,जुन्या पेन्शनच्या मागणीचे आंदोलन देशभरात सुरु असून देशातील राजस्थान , छत्तीसगढ तसेच पश्चिम बंगाल राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागु करुन कर्मचाऱ्यांना सामाजिक व आर्थिक सुरक्षा प्रदान केली आहे .महाराष्ट्र राज्यात देखिल मागील जुनी पेन्शन साठी आंदोलने सुरु आहेत . पण पुरोगामी म्हणावणाऱ्या व उपरोक्त जूनी पेन्शन देणाऱ्या अन्य राज्यापेक्षा महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती उत्तम असून देखिल महाराष्ट्र राज्याचे आपल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली नाही . यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे .
यामुळेच जुनी पेन्शन साठी लागु न केल्यास भविष्यामध्ये तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटने मार्फत दि.21.09.2022 रोजी पेन्शन संदेश रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे . या रॅलीमध्ये महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना सक्रिय सहभाग घेत आहे .यामुळे जुनी पेन्शन योजना लागु करुन कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी आग्रहाची विनंती करण्यात आलेली आहे .
याबाबतचा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनाचे सविस्तर पत्र खालीलप्रमाणे आहे .